शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक शहराचा ऐतिहासिक वारसा जपायला हेरिटेज कमिटी हवी; योगेश कासार यांचे मत

By संजय पाठक | Updated: November 26, 2020 23:17 IST

नाशिक : शहराचे वैभव खूप मोठे आहे. इथल्या वास्तू हे संचित आहे. मात्र, त्यांचे जतन करायला हवे, दुर्दैवाने तसे होताना दिसत नाहीत अनेक शहरांत महापालिकेच्या हेरिटेज कमिटीच्या माध्यमातून काही ना काही प्रयत्न सुरू असताना नाशिकमध्ये तसे होत नाहीत, अशी खंत नाशिकमधील अभियंता आणि पुरातत्व क्षेत्रातील अभ्यासक योगेश कासार यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देनाशकात संपन्न वारसा  मनपाचे प्रयत्न हवे 

नाशिक : शहराचे वैभव खूप मोठे आहे. इथल्या वास्तू हे संचित आहे. मात्र, त्यांचे जतन करायला हवे, दुर्दैवाने तसे होताना दिसत नाहीत अनेक शहरांत महापालिकेच्या हेरिटेज कमिटीच्या माध्यमातून काही ना काही प्रयत्न सुरू असताना नाशिकमध्ये तसे होत नाहीत, अशी खंत नाशिकमधील अभियंता आणि पुरातत्व क्षेत्रातील अभ्यासक योगेश कासार यांनी व्यक्त केली.

कासार हे नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरचे सदस्य असून, नाशिकमध्ये पुरातन वास्तू, मंदिरे इतकेच नव्हे तर नदी संवर्धनाचाहीदेखील अभ्यास करीत आहेत. सध्या जागतिक वारसा सप्ताह सुरू असून, त्या पार्श्वभूमीवर लोकमतशी संवाद साधताना नाशिक महापालिकेच्या वतीने हेरिटेज कमिटी स्थापन करावी, अशी मागणी केली.

प्रश्न- नाशिकमध्ये वारसा जतन करण्याची गरज का भासते?कासार- नाशिक हे खूपच संपन्न शहर आहे. या शहरात अगणित वास्तू आहेत. त्याचे कुठे तरी जतन झाले पाहिजे. नाशिक शहरात जुने वाडे आहेत. उन्हाळ्यात शीतल, तर हिवाळ्यात तापमान कायम राखणारे हे वाडे खऱ्या अर्थाने ग्रीन बिल्डिंग आहेत. परंतु त्याचे महत्त्व लक्षात आले पाहिजे, गोदावरी तसेच अनेक मंदिरे हेदेखील शहराचा वारसा आहे. तो आहे, त्याच पद्धतीने जतन करणे हे खरे कौशल्य आहे.

प्रश्न - हेरिटेज कमिटीच्या माध्यमातून काय साध्य होऊ शकते?कासार - सध्या मुंबई, पुणे, सेालापूर, कोल्हापूर, औरंगाबाद अशा अनेक महापालिकांमध्ये हेरिटेज कमिटी आहेत. त्या आपल्या क्षेत्रातील वास्तू जतन करण्यासाठी प्रयत्न करतात. नाशिकमध्ये महापालिकेने एक समिती स्थापन केली होती, त्यांनी काही वाडेदेखील अधिसूचित केले. परंतु या समितीला अधिकार देण्यात आले नसल्याने वारसा जतन करण्याचे काम झाले नाही. त्यामुळे त्यांनी जे वाडे संवर्धन करण्यासाठी ठेवण्याचे ठरवले हेाते. ते सारेच आज जागेवरच नाहीत. जिल्हाधिकारी कार्यालये, काळाराम मंदिर अशा अनेक वास्तू अत्यंत पुरातन आणि पाषाणातील आहेत, त्याचे संवर्धन शास्त्रीय पद्धतीने झाल्यास त्या टिकू शकतील. अशास्त्रीय पद्धतीने काम झाल्यास तो केवळ दिखावा ठरेल.

प्रश्न- अशा वास्तू संवर्धनाबाबत नागरिकांतही जागृती हवी?कासार- होय. अनेकदा एखादी वास्तू पुरातन असल्याने ती संग्रहित करायचा निर्णय घेतला तर आपला मालकी हक्क संपुष्टात येईल असे अनेकांना वाटते. त्या भीतीने ते वास्तू संरक्षित करू देण्यास विरोध करतात. वास्तविक अशा इमारतींची अ, ब, क, ड अशी विगतवारी केली जाते. त्यात अ दर्जाच्या मिळकतींमध्ये कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करता येत नाही ब, क, ड मध्ये काहीअंतर्गत, तर काही बाह्य बदल करता येतात हे समजून घेतले पाहिजे. तसे झाल्यास नागरिकांचा प्रतिसाद निश्चितच वाढू शकतो.सध्या तर राज्य शासन एक ट्रस्ट निर्माण करून त्या माध्यमातून कंपन्याच्या सीएसआर निधीचा वापर करता येईल काय याचा विचार सुरू आहे. त्याचा फायदा होऊ शकतो.

मुलाखत संजय पाठक

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाState Governmentराज्य सरकार