शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
2
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
3
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
4
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली
5
पाकिस्तान युद्धात सैनिक लढला होता, नंतर पेन्शनशिवाय काढून टाकले; पत्नीला ५७ वर्षांनंतर मिळाला न्याय
6
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
7
Ultraviolette ने कमाल केली, X47 Crossover मोटरसायकल भारतात आली: 2.74 लाख रुपयांपासून किंमत सुरु!
8
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
9
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
10
एकाच वेळी पाच-सहा मराठी सिनेमे रिलीज, कसं व्हायचं? प्रसिद्ध गायकाने मांडलं मत, इंडस्ट्रीबद्दल म्हणाला...
11
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
12
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
13
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
14
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
15
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
16
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
17
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
18
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
19
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
20
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले

काँग्रेसच्या गटनेतेपदी हेमलता पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 00:51 IST

मनपातील कॉँग्रेस पक्षाच्या गटनेतापदी शाहू खैरे यांना हटविण्यात आले असून, त्यांच्या जागी डॉ. हेमलता पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अर्थात, पाटील यांच्या नियुक्तीचे पत्र महासभेत वाचण्यास महापौरांनी टाळले त्यामुळे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

नाशिक : मनपातील कॉँग्रेस पक्षाच्या गटनेतापदी शाहू खैरे यांना हटविण्यात आले असून, त्यांच्या जागी डॉ. हेमलता पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अर्थात, पाटील यांच्या नियुक्तीचे पत्र महासभेत वाचण्यास महापौरांनी टाळले त्यामुळे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे.मनपातील काँग्रेस पक्षाच्या गटनेत्यांसह सर्वच पदाधिकारी बदलावे, अशी मागणी मध्यंतरी नाशिक दौऱ्यावर आलेले प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे काँग्रेसच्या नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी केली होती. त्यानंतर पक्षाने अधिकृत निर्णय घेतला. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. गणेश पाटील यांनी गेल्या बुधवारी (दि.२०) डॉ. हेमलता पाटील यांना पत्र दिले आहे. पाटील या कॉँग्रेसच्या ज्येष्ठ महिला नगरसेवक असून, प्रदेश कॉँग्रेसच्या प्रवक्ता आहेत. तसेच उत्तर महाराष्टÑाच्या समन्वयकपदी त्यांची अलीकडेच नियुक्ती झाली आहे.दरम्यान, महापौर रंजना भानसी यांनी कॉँग्रेस गटनेता हा त्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे, परंतु गोंधळामुळे पत्राचे वाचन करता आले नसल्याचे सांगितले. डॉ. हेमलता पाटील यांची गटनेता पदावर वर्णी लागल्याने नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीवरदेखील त्यांची गटनेता म्हणून संचालक नियुक्ती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.बुधवारी (दि.२०) महासभेत याबाबत घोषणा होणे अपेक्षित होते, परंतु त्या सभेत गोंधळ झाला होता. त्याचप्रमाणे शुक्रवारी (दि.२०) महासभेत घोषणा होणे अपेक्षित होते, परंतु महापौरांनी अभिनंदनाचे प्रस्तावातदेखील तो घेतला नसल्याने कॉँग्रेसच्या गटनेता बदलण्यास भाजपाचा विरोध आहे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाcongressकाँग्रेस