शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
2
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
3
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
4
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
5
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
6
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
7
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
8
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
9
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
10
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
11
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
12
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
13
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानकडून काही तासांतच युद्धविरामाचं उल्लंघन, जम्मू, श्रीनगरमध्ये ड्रोनहल्ले
14
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
15
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
16
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
17
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
18
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
19
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
20
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला

कोरोना सहायता केंद्राला मदतीचा ओघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 22:11 IST

लॉकडाउनमुळे हातावर पोट भरणाऱ्या गोरगरीब कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पाश्वभूमीवर सिन्नर शहरातील सामाजिक संघटनांनी कोरोना सहायता केंद्राची स्थापना केली आहे. या मदत केंद्राच्या माध्यमातून गोरगरीब जनतेसाठी मदतीचा ओघ सुरू झाला आहे.

ठळक मुद्देदातृत्वाचे दर्शन : दानशूर व्यक्तींनी केलेली मदत गरजूंपर्यंत पोहोचविण्यासाठी रूपरेषा

सिन्नर : लॉकडाउनमुळे हातावर पोट भरणाऱ्या गोरगरीब कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पाश्वभूमीवर सिन्नर शहरातील सामाजिक संघटनांनी कोरोना सहायता केंद्राची स्थापना केली आहे. या मदत केंद्राच्या माध्यमातून गोरगरीब जनतेसाठी मदतीचा ओघ सुरू झाला आहे.सिन्नकरांनी दोन दिवसात सुमारे तीन लाख ८१ हजारांचा मदतनिधी केंद्राकडे सुपुर्द करून दातृत्वाचे दर्शन घडविले आहे. काही संस्थांनी अन्नधान्य तसेच किराणा साहित्याची मदत देऊ केली आहे. त्यामुळे लॉकडाउनच्या काळात असाहाय्य जीवन जगणाºया कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निकाली निघणार असल्याचे आशादायी चित्र निर्माण झाले आहे. सहायता केंद्राच्या स्थापनेचा निर्णय होताच याबाबत सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची लायन्स क्लब आॅफ सिन्नर सिटीच्या रामनगरी येथील हॉलमध्ये बैठक घेण्यात आली. या बैठकी दानशूर व्यक्तींनी केलेली मदत गरजूंपर्यंत पोहोचविण्याबाबतची रूपरेषा ठरविण्यात आली.कोणीही गरजू कुटुंब मदतीपासून वंचित राहू नये किंवा अकारण कोणाला जादा मदत जाऊ नये, याची काळजी घेण्याचे बैठकीत ठरविण्यात आले. तहसीलदार राहुल कोताडे व मुख्याधिकारी संजय केदार याच्या मार्गदर्शनाखाली महसूल व नगरपालिकेच्या कर्मचाºयांमार्फत तसेच सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने गरजू कुटुंबांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला. या कामाला तत्काळ सुरु वात करण्यात आली. रोख, धनादेश अथवा अन्नधान्य स्वरु पातील मदत शहरात एकाच ठिकाणी जमा करण्याच्या व योग्य पद्धतीने वितरित करण्याच्या उद्देशाने लायन्सक्लब आॅफ सिन्नर सिटीचा हॉल हेच मदत केंद्र म्हणून घोषित करण्यात आले.मदतीचे धनादेशदेखील लायन्सच्या नावाने स्वीकारण्यात येत आहेत. संबंधितांना त्याची रीतसर पावती दिली जाणार असून ही मदत एकत्र करून एका कुटुंबातील चार व्यक्तींना किमान पंधरा-वीस दिवस पुरेल इतके किराणा साहित्याचे किट तयार करण्यात येणार आहे. एचपीसीएल कंपनीने पहिल्या टप्प्यातील ५० किट मदत केंद्राकडे सुपुर्द केले असून किट ते शहराच्या वेगवेगळ्या भागातील गरजू कुटुंबांना वाटप करण्यात येणार आहे. बैठकीला शहरातील विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.लालाशेठ चांडक एक लाख, प्रमोद चोथवे ५१ हजार, लायन्स क्लब आॅफ सिन्नर सिटी ५१ हजार, सिन्नर तालुका जनसेवा मंडळ ५१ हजार, रोटरी क्लब आॅफ गोंदेश्वर ३१ हजार, श्री इच्छापूर्ती गणेश मंडळ ३१ हजार, अरु ण व सुनील कलंत्री २५ हजार, बाळासाहेब देशपांडे २१ हजार, वंदना सुनील काळे १० हजार, तुकाराम काळू एखंडे १० हजार यांनी आर्थिक मदत केली आहे. दोन दिवसात तीन लाख ८१ हजार रुपयांचा निधी तसेच नगरसेवक शैलेश नाईक यांच्या वतीने जनसेवा मंडळामार्फत अंगाचे व कपड्याचे साबण, डॉ. प्राणेश सानप यांच्या वतीने अंगाचे साबण, सह्याद्री युवा मंचच्या वतीने धान्य मदत केंद्रात जमा झाले आहे. गरजूंना वाटप करण्यासाठीचे किट लायन्सच्या हॉलमध्येच तयार करण्यात येणार आहे. तथापि, हे काम महिला बचतगटांना देण्याचे बैठकीत ठरविण्यात आले. या माध्यमाने बचतगटाच्या महिलांना रोजगार उपलब्ध होईल, अशी आशा आहे. हातावरच्या गरजू कुटुंबांना समप्रमाणात किराणा साहित्य पुरविले जावे यासाठी महिला बचतगटाच्या माध्यमातून हे काम करून घेतले जाणार आहे. त्यामुळे कामात सुटसुटीतपणा राहील असे सांगण्यात आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या