शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

वृत्तपत्र विक्रेत्यांना शासनाकडून मदतीचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 00:14 IST

वृत्तपत्र वाचल्याशिवाय सहसा कोणी घराच्या बाहेर पडत नाही. कुठल्याही ऋतूची पर्वा न करता वृत्तपत्र विक्रेते आपले काम अत्यंत इमानदारीने व कष्टाने पूर्ण करतात. शासनाकडून वृत्तपत्र विक्रेत्यांना मदत व सवलत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे प्रतिपादन आमदार बाळासाहेब सानप यांनी केले.

ठळक मुद्देबाळासाहेब सानप : गुणवंत पाल्यांचा गौरव, साहित्य वाटप

नाशिकरोड : वृत्तपत्र वाचल्याशिवाय सहसा कोणी घराच्या बाहेर पडत नाही. कुठल्याही ऋतूची पर्वा न करता वृत्तपत्र विक्रेते आपले काम अत्यंत इमानदारीने व कष्टाने पूर्ण करतात. शासनाकडून वृत्तपत्र विक्रेत्यांना मदत व सवलत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे प्रतिपादन आमदार बाळासाहेब सानप यांनी केले.जेलरोड येथील कुलथे मंगल कार्यालयात नाशिकरोड वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्थेतर्फे वृत्तपत्र विक्रेत्यांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभप्रसंगी सानप बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लोकमतचे वितरण व्यवस्थापक दुष्यंत पाराशर यांच्यासह हेमंत वाल्हे, स्वाती दुर्वे, अभिजित गरूड, संजय जोरे, आर. आर. पाटील, प्रसाद क्षत्रिय, अभिषेक तिवारी, संजय मुंडलिक, विशाल जमधडे, ओंकार कानडे, नाशिकरोड वृत्तपत्र विक्रेता संस्थेचे अध्यक्ष सुनील मगर, उपाध्यक्ष महेश कुलथे, सचिव भारत माळवे, खजिनदार वसंत घोडे, कार्याध्यक्ष गौतम सोनवणे, सुनील जाधव, हर्षल ठोसर, उल्हास कुलथे, मनोहर खोले, अनिल कुलथे, योगेश भट, संदीप परसे, किशोर सोनवणे, राजेंद्र शिंदे, उत्तम गांगुर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृत्तपत्र विक्रेत्यांच्या ११० पाल्यांचा सत्कार करून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच लकी ड्रॉ द्वारे सहा पैठणींचेही वाटप करण्यात आले. स्वच्छता दूत म्हणून ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते ईस्माईल पठाण यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुनील मगर यांनी केले. सूत्रसंचलन महेश कुलथे व आभार भारत माळवे यांनी मानले. यावेळी वृत्तपत्र विक्रेते व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकStudentविद्यार्थी