शहरं
Join us  
Trending Stories
1
चारशे पार सोडा, मोदी आणि एनडीएला २५० जागाही मिळणार नाहीत, या एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज 
2
खळबळजनक! नांदेडमध्ये मशीन गनचे ३९१ राऊंड कालव्यात सापडले
3
Exit Poll : कंगना राणौत की विक्रमादित्य सिंह... कोण मारणार बाजी?; जाणून घ्या, मंडीचा एक्झिट पोल
4
अमेरिकेकडून कॅनडाचा धुव्वा! ६ तारखेला USA vs PAK लढत; नेटकऱ्यांनी शेजाऱ्यांची उडवली खिल्ली
5
दोन राज्यांत मतमोजणी, अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाची मुसंडी, तर सिक्कीममध्ये SKM निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने 
6
T20 WC, USA vs CAN: यजमानांचा दबदबा! १० सिक्स आणि ४ फोर; एकट्या 'जोन्स'ने कॅनडाला घाम फोडला
7
धक्कादायक! मद्यधुंद अवस्थेत रवीना टंडनने केली वृद्ध महिलेला मारहाण? मध्यरात्री नेमकं काय घडलं?
8
"मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील"
9
आयकर विभागाचा मोठा छापा; हवाला व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांकडून २५ कोटींची रोकड, हिरे, सोनं जप्त
10
सातवा टप्पाही पूर्ण; निकालाची प्रतीक्षा; ८,३६० उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद
11
'मी केदारनाथला गेल्यावर..'; सुशांतच्या बहिणीची भावूक पोस्ट, फोटो शेअर करत सांगितलं खास कनेक्शन
12
किती खरे आणि किती खोटे ठरले यापूर्वीचे ‘एक्झिट पाेल’?, मतदानानंतर सर्वांचे असते याकडे लक्ष
13
T20 WC 2024: ऑस्ट्रेलिया नाही! पण भारत फायनल खेळणार; 'युवी'ने सांगितला खेळ भावनांचा
14
धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
15
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
16
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
17
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
18
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
19
आजही अडचणींचा डोंगर, वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन
20
एमएचटी-सीईटीच्या चुकीच्या उत्तरांची दखलच नाही, एक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील फॉर्म्युल्यावर आधारित 

पूरग्रस्तांसाठी सरसावले मदतीचे हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 12:39 AM

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये भीषण पूरपरिस्थिती ओढावल्याने या भागात राहणाऱ्या नागरिकांचे जीवन उद्ध्वस्थ झाले आहे. या भागातील नागरिकांच्या पुनर्वसनासाठी संपूर्ण राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू असताना नाशिकमधील औद्योगिक क्षेत्रातील सिएट कंपनीच्या कामगारांनीही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.

नाशिक : पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये भीषण पूरपरिस्थिती ओढावल्याने या भागात राहणाऱ्या नागरिकांचे जीवन उद्ध्वस्थ झाले आहे. या भागातील नागरिकांच्या पुनर्वसनासाठी संपूर्ण राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू असताना नाशिकमधील औद्योगिक क्षेत्रातील सिएट कंपनीच्या कामगारांनीही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.सातपूर येथील सिएट एम्प्लॉइज को-आॅपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने शुक्रवारी (दि.२३) पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदतीचा धनादेश दिला आहे. यावेळी सोसायटीचे चेअरमन नितीन दवे, युनियन अध्यक्ष भिवाजी भावले, सचिव कैलास धात्रक, सोसायटीचे सचिव अंकुश कोडग, उपाध्यक्ष राजाराम इखे, सहसचिव सागर शिंदे, खजिनदार भरत सांगळे, संचालक दशरथ चौबे, संचालक अरुण लांडगे, संचालक योगेश दोंदे, संजय रासकर यांच्यासह सोसायटी सभासद व कर्मचारी उपस्थित होते.भगर मिलतर्फे पूरग्रस्तांना मदतभगर मिल असोसिएशनतर्फे पूरग्रस्तांना मदत करण्यात आली. कोल्हापूर व सांगली येथील पूरग्रस्थ लोकांना मदतीचा हात पुढे क रून दोन लाखांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिला असून, सदरचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दोंडाईचा येथे सुपुर्द क रण्यात आला. यावेळी अध्यक्ष महेंद्र छोरिया, उपाध्यक्ष उमेश वैश्य, अशोक साखला, दीपक राठी आदी उपस्थित होते.छायाचित्रकार संघटनेच्या वतीनेपूरग्रस्तांसाठी मदतनाशिक : छायाचित्रकार संघटनेच्या वतीने जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त पूरग्रस्तांसाठी मदत प्रबोधनपर संदेश पदयात्रा एक आगळा वेगळा असा उपक्रम राबविण्यात आला. छायाचित्रकार संघटनेचे अध्यक्ष संजय जगताप यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर, सांगली, नाशिक येथील पूरग्रस्तांसाठी प्रबोधनपर संदेश पदयात्रचे आयोजन करण्यात आले होते.पूरग्रस्तांसाठी प्रबोधनपर संदेश देणारे फलक छायाचित्रकारांनी हाती घेतले होते . तसेच राजेबाहद्दर हॉस्पिटलच्या वतीने डॉ. शालमली इनामदार तसेच डॉ.संदीप राजेबाहद्दर यांनी सभासदांना हेल्थअवेरनेस वर मार्गदर्शन केले .तसेच संघटनेचे ज्येष्ठ छायाचित्रकार सभासद दिलीप येलमामे यांनी योगा विषयी माहिती दिली.महाराष्ट्र फोटोग्राफी असोसिएशन चे अध्यक्ष गणेश घरत. छायाचित्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हिरामण सोनवणे, पंकज अहिरराव, सुरेंद्र पगारे, नंदू विसपुते, रवींद्र सूर्यवंशी, कैलास निरगुडे, प्रशांत तांबट, राज चौधरी, धनराज पाटील व संघटनेचे सभासद उपस्थित होते.विद्याप्रबोधिनी प्रशालेची पूरग्रस्तांसाठी मदतसेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या विद्याप्रबोधिनी प्रशालेच्या इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मदतीचे आवाहन करताच दुसºया दिवशीच तांदूळ, तूरडाळ शाळेमध्ये जमा झाली. सामाजिक बांधिलकी जपण्याचा उद्देश सफल झाला. संघाच्या जनकल्याण समितीच्या माध्यमातून हे सर्व धान्य पूरग्रस्तांना पोचविण्यात आले.पूरग्रस्तांनाशासनाची मदत४मुसळधार पावसामुळे गोदावरीला आलेल्या पुराचे पाणी घरात घुसून संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झालेल्या पूर्व विधानसभा मतदारसंघातील सुमारे सातशे कुटुंबांना शासनाच्या माध्यमातून आमदार बाळासाहेब सानप यांच्या हस्ते शनिवारी पूरग्रस्तांची भेट घेऊन धनादेश वाटप करण्यात आले. पावसामुळे गोदावरी नदीला महापूर आला होता. शासनाच्या माध्यमातून पूरग्रस्तनागरिकांचे पंचनामे करून त्यांना तत्काळ मदत करण्याचे शासनाचे आदेश असल्याने शनिवारी सकाळी पूरग्रस्त कुटुंबीयांना प्रतिकुटुंब पंधरा हजार रुपये असे सुमारेसातशे धनादेश वाटप केले. यावेळी नगरसेवक कमलेश बोडके, मच्छिंद्र सानप,नरेश पाटील, तलाठी कविता गांगुर्डे, मधुबाला भोरे, राजेश भोरे, सुनील महांकाळेआदींसह नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :floodपूरRainपाऊसnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय