दिंडोरी : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पाडे येथील उपक्रमशील शिक्षक चरणसिंग पाटील (३२) या तरूण शिक्षकाचा मार्च महिन्यात कोरोनामुळे मृत्यू झाल्याने व पाटील हे डीसीपीएस योजनेत असल्यामुळे त्यांना पेन्शन, ग्रॅच्युएटी लाभ मिळणार नसल्याने यातील गांभीर्य ओळखून दिंडोरी तालुक्यातील शिक्षकांनी निधी जमवून त्यांच्या कुटुंबीयांना साडेचार लाख रुपये मदतीचा धनादेश शनिवारी (दि.१९) गटशिक्षणाधिकारी भास्कर कनोज, विस्तार अधिकारी एस पी पगार, के. पी. सोनार व सर्व शिक्षक संघटना समन्वय समिती यांच्या उपस्थितीत त्यांच्या पत्नी स्नेहल पाटील यांना देण्यात आला.यावेळी उपसरपंच नरेंद्र पेलमहाले, सचिन वडजे, रावसाहेब जाधव, राजेंद्र परदेशी, धनंजय आहेर, जयदीप गायकवाड, चौरे, दिगंबर बादाड, प्रल्हाद पवार, किरण शिंदे, प्रविण वराडे, योगेश बच्छाव, मधुकर आहेर, प्रदीप महाले, सुर्यवंशी, कोठावदे, जितेंद्र खोर, कल्याण कुडके, पोतदार आदींनी मनोगत व्यक्त केले.
मयत शिक्षकाच्या कुटुंबीयांना मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 23:03 IST
दिंडोरी : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पाडे येथील उपक्रमशील शिक्षक चरणसिंग पाटील (३२) या तरूण शिक्षकाचा मार्च महिन्यात कोरोनामुळे मृत्यू झाल्याने व पाटील हे डीसीपीएस योजनेत असल्यामुळे त्यांना पेन्शन, ग्रॅच्युएटी लाभ मिळणार नसल्याने यातील गांभीर्य ओळखून दिंडोरी तालुक्यातील शिक्षकांनी निधी जमवून त्यांच्या कुटुंबीयांना साडेचार लाख रुपये मदतीचा धनादेश शनिवारी (दि.१९) गटशिक्षणाधिकारी भास्कर कनोज, विस्तार अधिकारी एस पी पगार, के. पी. सोनार व सर्व शिक्षक संघटना समन्वय समिती यांच्या उपस्थितीत त्यांच्या पत्नी स्नेहल पाटील यांना देण्यात आला.
मयत शिक्षकाच्या कुटुंबीयांना मदतीचा हात
ठळक मुद्देदिंडोरी तालुक्यातील शिक्षकांकडून साडेचार लाखांचा मदतनिधी