शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' खुनाचा उलगडा : गर्भपातासाठी मदतीचा लावला तगादा अन‌् चुलत भावाने काढला बहिणीचा काटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 19:26 IST

'तु माझा पती बनून माझ्यासोबत डॉक्टरकडे चल आणि गर्भपात करुन आण' असा तगादा मयत जैनब हिने लावला होता.

ठळक मुद्देदेवळालीगावातून पोलिसांनी ठोकल्या बेड्याअनैतिक संबंधातून जैनबचा खून झाल्याचा अंदाज चुलत भावाला बेड्या ठोकल्या आहे

नाशिक : तपोवनातील लक्ष्मीनारायण पुलाच्या अलीकडे रामटेकडीच्या पायथ्याशी मोकळ्या पटांगणात बेवारसपणे आढळून आलेल्या 'त्या' युवतीच्या मृतदेहाची ओळख पटविण्यास पोलिसांना अखेर यश आले आहे. युवतीच्या खूनाचा उलगडा करत पोलिसांनी याप्रकरणी मयत महिलेच्या चुलत भावाला बेड्या ठोकल्या आहे. अनैतिक संबंधातून तिची हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त होत आहे.

तपोवनाजवळ गोदाकाठालगत निर्जनस्थळी गेल्या शनिवारी (दि.१२) भद्रकाली पोलिसांना एका स्त्री जातीचा मृतदेह बेवारसपणे कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. मृतदेह मोठ्या प्रमाणात कुजल्यामुळे पोलिसांना ओळख पटविणे कठीण झाले होते. महिलेच्या डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने हल्लाा केल्यामुळे तीचा मृत्यु झाल्याचे शवविच्छेदन अहवालातुन स्पष्ट झाले होते.याप्रकरणी भद्रकाली पोलीसांनी अज्ञात मारेकऱ्याविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करत तपास सुरु केला. गुन्हे शाखेचे उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार यांनी या गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश गुन्हे शाखा युनीट-१च्या पथकाला दिले. वरिष्ठ पोलीस निरिक्षक आनंदा वाघ यांनी तत्काळ सहायक निरिक्षक महेश कुलकर्णी, रघुनाथ शेगर यांचे पथक तयार करुन अज्ञात मारेकऱ्याचा व मयत स्त्रीच्या नातेवाईकांचा शोध सुरु केला.

दरम्यान, पोलिसांनी माहिती घेत चाचपणी सुरु करत मोबाइलचे तांत्रिक विश्लेषण करत देवळालीगावापर्यंतचा माग काढला. देवळालीगावातील महिलेचा मृतदेह असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी तिच्या नातेवाईकांचे घर शोधून त्यांच्याद्वारे मृतदेहाची ओळख पटविली. जैनब शाम उर्फ जाकिर कुरेशी या युवतीचा मृतदेह असल्याची पोलिसांना खात्री पटली. देवळाली गावात तपासी पथकाने नातेवाईकांकडे सखोल चौकशी करत तीचा नातेवाईक असलेला चुलत भाऊ संशयित दानिश जावेद कुरेशी (२०,रा. लोहारवाडा, देवळाली गाव) यास ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखविला असता त्याने खुनाच्या गुन्ह्याची प्राथमिक कबुली दिली. याप्रकरणी पोलिसांनी त्यास बेड्या ठोकून पुढील तपासाकरिता भद्रकाली पोलिसांच्या हवाली केले आहे.

तीन महिन्यांची होती गर्भवतीमयत जैनब ही तीन महिन्यांची गर्भवती होती अशी माहिती पोलिसांनी दिली. 'तु माझा पती बनून माझ्यासोबत डॉक्टरकडे चल आणि गर्भपात करुन आण' असा तगादा मयत जैनब हिने लावला होता. यामुळे तिला तपोवन येथील एका जडीबुटी देणाऱ्या वैद्याकडे गर्भपात करण्यासाठी घेऊन जाण्याचा बनाव करत ५ डिसेंबर रोजी मध्यरात्री दोन वाजता तिला तपोवन येथे दुचाकीने आणून तिचा गळा आवळला आणि डोक्यात दगड टाकून ठार मारले, अशी कबुली संशयित दानिश याने पोलिसांकडे दिली आहे. अनैतिक संबंधातून जैनबचा खून झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयMurderखूनArrestअटक