शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

सायखेडा शिवारातील मेंढपाळांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 17:55 IST

कोरोनामुळे आठवडे बाजार बंद असल्यामुळे मेंढपाळांना मेंढ्या विकण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. बाजार सुरू नसल्याने दैनंदिन खर्चासाठी तसेच किराणा, धान्य खरेदीसाठी पैसे नसल्याने उपासमारीची वेळ आलेल्या सायखेडा शिवारातील मेंढपाळांना पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने अध्यक्ष भाऊसाहेब ओहळ यांच्या हस्ते किराणा आणि धान्याचे शेतात जाऊन वाटप करण्यात आले.

सायखेडा : कोरोनामुळे आठवडे बाजार बंद असल्यामुळे मेंढपाळांना मेंढ्या विकण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. बाजार सुरू नसल्याने दैनंदिन खर्चासाठी तसेच किराणा, धान्य खरेदीसाठी पैसे नसल्याने उपासमारीची वेळ आलेल्या सायखेडा शिवारातील मेंढपाळांना पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने अध्यक्ष भाऊसाहेब ओहळ यांच्या हस्ते किराणा आणि धान्याचे शेतात जाऊन वाटप करण्यात आले.कोरोना रोगाच्या प्रसारामुळे अनेक गावे, शहरे बंद आहेत. याचा परिणाम सर्वसामान्य लोकांच्या जीवनमानावर झाला असून त्यांना दैनंदिन जीवनासाठी लागणारा पैसा, धान्य, किराणा अशा विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ग्रामीण भागातील शेतमजूर, छोटे व्यावसायिक, सलून दुकानदार यांच्या दैनंदिन जीवनमानावर मोठा परिणाम झाला आहे. त्याचप्रमाणे गावागावात आणि शेतात राहणाऱ्या मेंढपाळांवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. संचारबंदी कायदा लागू असल्यामुळे अनेक ठिकाणच्या बाजारपेठा पूर्णत: बंद आहेत.  ते मेंढ्या विकू शकत नसल्यामुळे दररोज लागणारा किराणा आणि धान्य कसे उपलब्ध करावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन हवालदिल झालेल्या मेंढपाळांना त्यांनी ज्या शेतात राहोटी दिली आहे तेथे जाऊन पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर सामाजिक बहुउद्देशीय संस्थेने किराणा व धान्याचे वाटप केले. याप्रसंगी निवृत्ती मराळे, संतोष पाल्हाळ, अण्णा ढेपले, अनिल मराळे, रमेश ढेपले यासह मेंढपाळ उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकSocialसामाजिक