शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लष्करी अळीच्या हल्ल्याने शेतकरी हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 16:33 IST

कळवण तालुका : वडाळेवणीत जागृती मेळावा

ठळक मुद्देमका पिकाची उगवण होताच बळीराजा हजारो रु पये खर्च करून कीटक नाशकांच्या फवारण्या करत आहेत. परंतु काही प्रमाणात अळीच्या नियंत्रणासाठी यश आले असले तरी अनेक जण मात्र हतबल झाले आहेत.

कळवण - कळवण तालुक्यात अमेरिकन लष्करी अळीने मका पिकावर हल्ला चढविल्याने शेतकरी बांधव हतबल झाले आहेत. कृषी विभागाने नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू केले असून कृषी सहाय्यक संगीता राऊत ,मंडळ कृषी अधिकारी सीताराम पाखरे तसेच तालुका कृषी अधिकारी विजय पाटील यांनी मौजे-वडाळे वणी गावात जाऊन शेतकरी मेळावा तसेच प्रत्यक्ष शेतात जाऊन लष्करी अळी बाबत जागृती केली.तालुक्यात अजून पूर्णपणे पेरणी झालेली नाही. आतापर्यंत अंदाजे १६ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. तालुक्यात ज्या भागात पाऊस झाला त्या भागात मका पिकाच्या पेरण्या झालेल्या आहेत . मात्र उगवणी नंतर झाड वाढीस लागताच पानावर लष्करी अळी हल्ला करीत असल्याने बळीराजा हतबल झाला आहे .तालुक्यात पहिल्यांदाच या अळीने आक्रमण केले आहे . या अळीची अंडी कोष पतंग या चार अवस्थेत वाढ होते. हि अळी हजार ते दीडहजार अंडी देते. पिकाच्या कोवळ्या फांद्यांवर हल्ला चढवते . त्यामुळे पानावर पांढरे चट्टे पडतात . अळी मोठी आल्यानंतर पिकाचे पाने खाऊन त्यावर विष्ठा करतात. त्यामुळे वाढीपूर्वी मक्याच्या फांद्यांचे प्रचंड नुकसान होते. मका पिकाची उगवण होताच बळीराजा हजारो रु पये खर्च करून कीटक नाशकांच्या फवारण्या करत आहेत. परंतु काही प्रमाणात अळीच्या नियंत्रणासाठी यश आले असले तरी अनेक जण मात्र हतबल झाले आहेत. यामुळे कृषी विभागाने तालुक्यात गावागावात जाऊन पिकाची पाहणी सुरु केली आहे. विविध गावात अळी नियंत्रणात आणण्यासाठी मेळावे घेतले जात आहेत ...अशी करा उपाययोजना!कीड ग्रस्त पिकाच्या शेतातील खोल नांगरणी करावी म्हणजे पक्षांद्वारे किडीच्या वेगवेगळ्या अवस्था नष्ट करण्यास मदत होते. शेतात एकरी ४ पक्षी थांबे उभारावेत जेणे करून पानावरील अळी टिपून खाते. पिकावरील नियमित सर्वेक्षण करावे. या किडींचे पतंगांना आकर्षित करण्यासाठी कामगंध सापळ्यांचा वापर करावा. पिकावरील अंडी समूह अळ्या हाताने गोळा करून नष्ट कराव्यात. १५०० पी.पी.एम. किव्हा निंबोळी अर्क ५ टक्के ५० मि.ली. १० लिटर पाण्यात मिसळून फराव्यात. मका अमेरिकन लष्करी अळीच्या बंदोबस्तासाठी शेतकऱ्यांनी एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी विजय पाटील यांनी केले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती