शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मिडियाच्या माध्यमातून मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 15:54 IST

दातृत्व : पांढरीपाडा शाळेला मिळाली पाण्याची टाकी

ठळक मुद्देयापूर्वीही काही दानशूर व्यक्तींनी या शाळेसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यातून आदिवासी व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय व भौतिक साहित्य घेतले जात आहे.

कळवण : विद्यार्थ्यांच्या पोटाची व ज्ञानाची भूक भागवण्याबरोबरच त्यांची पिण्याच्या पाण्याची तहानही भागवायला हवी या उद्देशाने तालुक्यातील दुर्गम भागातील पांढरीपाडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत दानशूर व्यक्तींच्या मदतीतून पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. कळवण येथील व्यावसायिक तुषार मालपुरे यांनी या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पाण्याची टाकी भेट दिली. यामुळे शुद्ध व स्वच्छ पाणी शाळेला उपलब्ध झाले आहे.आदिवासी वस्ती व दुर्गम भागात असलेली पांढरीपाडा शाळा तशी दुर्लक्षितच होती. शाळेचे अंतरंग व बाह्यांग बदलत असतांना शाळेसाठी सार्वजनिक नळ पाणी पुरवठा केला जात होता परंतु पाणी साठवण्यासाठी सोय नव्हती. आर्थिक तरतूद नसल्याने सर्व पर्याय खुंटले होते. परंतु एक अपेक्षा म्हणून मुख्याध्यापक भास्कर भामरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शाळेच्या भौतिक सुविधांसाठी विविध गृपवर आर्थिक मदतीचे आवाहन केले असता येथील युवा व्यावसायिक तुषार मालपुरे यांनी प्रतिसाद देत शाळेसाठी ही मदत केली. यापूर्वीही काही दानशूर व्यक्तींनी या शाळेसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यातून आदिवासी व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय व भौतिक साहित्य घेतले जात आहे. एकीकडे सोशल मिडियाच्या गैरवापरामुळे तरु णपिढी भरकटत असल्याचे चित्र असतांना शिक्षकांनी आवश्यक मदतनिधीसाठी सोशल मिडियाचा आधार घेवून त्याच्या सदुपयोगाचेही दर्शन घडविले आहे. शैक्षणिक पर्यटन स्थळ करण्याचा मानससोशल मिडियाच्या माध्यमातून ख-या गरजूंना मदत मिळवून दिल्याने आनंद झाला. शाळेसाठी अद्याप ब-याच सुविधांची वानवा असून भविष्यात पांढरीपाडा शाळा एक शैक्षणिक पर्यटन स्थळ करण्याचा मानस आहे.-भास्कर भामरे, मुख्याध्यापक, पांढरीपाडा

टॅग्स :NashikनाशिकSocial Mediaसोशल मीडिया