शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मानवनिर्मित दुर्घटनाग्रस्तांनाही मिळणार मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 01:41 IST

राष्टÑीय व राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांतर्गत नैसर्गिक आपत्तीतील दुर्घटना घडल्यास संंबंधितांना नुकसानभरपाई देण्याची तरतूद असली तरी, काही दुर्घटना मानवनिर्मित घडत असल्याने त्यात बळी पडणाऱ्यांना आर्थिक मदत देण्याची आजवर नसलेली तरतूद शासनाने पूर्ण केली आहे. यापुढे किटकनाशक फवारणीतून होणारी विषबाधा, सार्वजनिक ठिकाणी घडणारी चेंगराचेंगरी व घरे, इमारत कोसळून होणाºया दुर्घटनेत मृत पावलेल्यांच्या कुटुंबीयांनाही मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देचार लाखांची भरपाई : राज्य शासनाचा निर्णय

नाशिक : राष्टÑीय व राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांतर्गत नैसर्गिक आपत्तीतील दुर्घटना घडल्यास संंबंधितांना नुकसानभरपाई देण्याची तरतूद असली तरी, काही दुर्घटना मानवनिर्मित घडत असल्याने त्यात बळी पडणाऱ्यांना आर्थिक मदत देण्याची आजवर नसलेली तरतूद शासनाने पूर्ण केली आहे. यापुढे किटकनाशक फवारणीतून होणारी विषबाधा, सार्वजनिक ठिकाणी घडणारी चेंगराचेंगरी व घरे,इमारत कोसळून होणाºया दुर्घटनेत मृत पावलेल्यांच्या कुटुंबीयांनाही मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.नैसर्गिक आपत्तीत वित्तहानीव जीवितहानी झाल्यास भरपाई देण्याची तरतूद असली तरी, त्यात ठरावीक हानींसाठीच भरपाई दिली जाते. परंतु मानवनिर्मित दुर्घटनाग्रस्तांना शासनाकडून आजवर कोणतीही मदत देण्याची तरतूद नव्हती. त्यामुळे अशा दुर्घटनांमध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधीतूनच मदतीसाठी प्रयत्न करावे लागत असे व त्यासाठी लोकप्रतिनिधींना गळ घालावी लागे. या सर्व गोष्टींचा विचार करता, ज्याप्रमाणे दंगलग्रस्त, आपदग्रस्तांना मदत देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याची शासनाची सन २००४ मधील योजना आहे, त्याच धर्तीवर मानवनिर्मित आपत्तीच्या घटनांमध्ये आपदग्रस्तांना सहानुभूतीच्या दृष्टिकोनातून तातडीने आर्थिक मदत देण्याचा निर्णय शासनाने अलीकडेच घेतला आहे. त्यात प्रामुख्याने शेतात किटकनाशक फवारणी करीत असताना होणाºया विषबाधेतून घडणारी दुर्घटना, धार्मिक ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी होणारी चेंगराचेंगरी, मोडकळीस आलेल्या अथवा जीर्ण झालेल्या निवासी इमारती, घरे कोसळून होणारे अपघात अशा आपत्तीच्या घटनांमध्ये यापुढे नुकसानभरपाई दिली जाणार आहे. त्यात मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयास चार लाख रुपये तर अपंगत्व आल्यास कमीत कमी ५० हजार ते दोन लाख रुपये, जखमी झाल्यास तीन ते चौदा हजार रुपये दिले जाणार आहे.

टॅग्स :GovernmentसरकारMONEYपैसा