शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
4
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
5
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
6
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
7
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
8
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
9
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
10
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
11
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
12
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
13
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
14
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
15
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
16
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
17
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
18
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
19
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
20
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल

अंध विद्यार्थ्यांना मदतीचा हात ,चेन्नईच्या ‘हेल्प द ब्लाईंड’ने दिली नाशिकच्या 38 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 15:38 IST

हेल्प द ब्लाईंडने गेल्या तीन वर्षापासून महाविद्यालयातील अंध विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती सुरू केली असून या माध्यमातून अंध विद्यार्थ्यांना 5 हजार रुपये व विद्यार्थिनींना 10 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळत असल्याने विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेऊन स्वावलंबी होण्यास मदत होत आहे

ठळक मुद्देनाशिकच्या अंध विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती हेल्प द ब्लाईंडचा दिव्यांगांना मदतीचा हात विद्यार्थ्यांना 5 हजार विद्यार्थीनींना 10 हजार रुपयांची शिष्यवृत्ती

नाशिक : शहरातील के टीएचएम महाविद्यालयाच्या अंध विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी चेन्नई येथील हेल्प द ब्लाईंड या संस्थेने आर्थिक मदतीचे पाठबळ उभे केले आहे. या संस्थेने केटीएचएम महाविद्यालातील 38 अंध विद्यार्थ्यांना शिष्टवृत्ती दिली असून एका विद्यार्थ्याला लॅपटॉपही देण्यात आला आहे. हेल्प द ब्लाईंडने गेल्या तीन वर्षापासून महाविद्यालयातील अंध विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती सुरू केली असून या माध्यमातून अंध विद्यार्थ्यांना 5 हजार रुपये व विद्यार्थिनींना 10 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळत असल्याने विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेऊन स्वावलंबी होण्यास मदत होत आहे.चेन्नई येथील ह्यहेल्प द ब्लाईंडह्ण या संस्थेकडून केटीएचएम महाविद्यालयातील 38 अंध विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.महाविद्यालयाच्या व्हीएलसी हॉलमध्ये मंगळवारी (दि.13) विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या धनादेशांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी प्रजापिता ब्रम्हकुमारी विश्वविद्यालयाच्या वासंतीदीदी, विनादीदी, हेल्प द ब्लाईंड संस्थेचे नाशिक विभागाचे समन्वयक व्ही. डी. सावकार, उपस्थित होते. यावेळी प्राचार्य व्ही. बी. गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, हेल्प द ब्लाईंड संस्था नेहमीच विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करून पाठबळ देते. या मदतीचे विद्यार्थ्यांनी मोल जाणले असून त्यातून शैक्षणिक प्रगती साधली आहे. यापुढेही विद्यार्थ्यांनी यासंस्थेच्या माध्यमातून मिळणाऱ्या मदतीचे भान ठेऊन उच्च शिक्षण घेत विविध क्षेत्रात यशाचे शिखर गाठण्यासाठी सातत्यपूर्ण कामिगरी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तर व्ही. डी. सावकार यांनी यावेळी हेल्प द ब्लाईंड संस्थेच्या विविध योजना व कामांची माहिती देऊन शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थ्यांनी त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख आणखी उंचावण्याचे आवाहन केले. वासंतीदीदी यांनी शैक्षणिक विकासाबरोबरच विद्यार्थ्यांनी अध्यात्मिक विकासाचाही ध्यास घ्यावा असे आवाहन करतानाच शिक्षणातून विद्यार्थ्यांच्या बुद्धीचा व अध्यात्मातून मनाचा विकास साधला जात असल्याचे त्यांनी सांगितले. शिष्यवृत्ती मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रफुल्ल भावसार, सागर जोरवर, आशा बेनके, सरस्वती काहीरे, गीता गवळी, संतोष नाठे, वैभव जगताप, अनिल पवार, प्रियंका जाधव, सोनू परदेशी, संगीता देवरे, सुमित जाधव, सुरज पाटील, राहुल धामणो, मयुरी साळवे, श्वेता तागडकर, राणी वाघेरे, कृष्णा पौल, जयश्री इंगळे, आश्रम गायकवाड, सुरेश भोईर, आरती कुलथे, अभिजित राऊत, भारती निकम, गायत्री सावळे, सारिका शिंदे, पंकज सावळे, सागर बोडके, सुमन बेनके, राहुल सोर, अश्विनी कहांडळ, प्रियंका घुमरे, अक्षय पाटील, वसंत चौधरी, आकाश चव्हाण, वेदांत मुंदडा, श्रीकृष्णा नाजगड व तारा उगळे या अंध विद्यार्थ्यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त संस्थेमार्फत आकाश चव्हाण या होतकरू अंध विद्याथ्र्यास लॅपटॉप भेट देण्यात आला.

टॅग्स :Studentविद्यार्थीNashikनाशिकcollegeमहाविद्यालय