देवळा तालुक्यात हेल्मेटसक्ती मोहीम बारगळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 04:45 PM2019-05-15T16:45:42+5:302019-05-15T16:45:47+5:30

देवळा : फेब्रुवारी महिन्यात देवळा पोलिसांनी हेल्मेटसक्तीची तालुक्यात राबविलेली मोहीम एक फार्सच ठरल्याचे चित्र सर्वत्र विना हेल्मेट दुचाकीस्वारांची संख्या पाहता दिसून येत आहे. यामुळे कारवाईच्या भीतीमुळे तीन महिन्यांपूर्वी खरेदी केलेले हेल्मेट आता अडगळीत पडले असून, विना हेल्मेट दुचाकी वाहनचालक रस्त्यावर सुसाट आहेत.

 Helmets mobilization campaign in Deola taluka | देवळा तालुक्यात हेल्मेटसक्ती मोहीम बारगळली

देवळा तालुक्यात हेल्मेटसक्ती मोहीम बारगळली

Next
ठळक मुद्देदेवळा तालुक्यात रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात आले होते. रस्ता सुरक्षा, वाहतूक नियमांचे पालन, हेल्मेट व सीट बेल्टचा वापर आदींबाबत प्रबोधन करण्यात येऊन जनजागृती करण्यात आली होती. दुचाकी वाहन चालविताना हेल्मेट वापरणे हे कायद्याने तसेच सुरक्षेच्या दृष्टीने

देवळा : फेब्रुवारी महिन्यात देवळा पोलिसांनी हेल्मेटसक्तीची तालुक्यात राबविलेली मोहीम एक फार्सच ठरल्याचे चित्र सर्वत्र विना हेल्मेट दुचाकीस्वारांची संख्या पाहता दिसून येत आहे. यामुळे कारवाईच्या भीतीमुळे तीन महिन्यांपूर्वी खरेदी केलेले हेल्मेट आता अडगळीत पडले असून, विना हेल्मेट दुचाकी वाहनचालक रस्त्यावर सुसाट आहेत.

महिनाभर ही मोहीम सुरू होती. या काळात देवळा शहर व तालुक्यात विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांवर तसेच नियमांचे पालन न करणाºया वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. हेल्मेटचे महत्त्व नागरिकांना पटू लागले असल्याचे चित्र निर्माण झाले होते; परंतु महिनाभरानंतर पोलिसांनी हेल्मेटसक्तीकडे दुर्लक्ष केल्यामुळे परिस्थिती परत जैसे थे झाली व विना हेल्मेट दुचाकीस्वार रस्त्यावर दिसू लागले.

Web Title:  Helmets mobilization campaign in Deola taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.