लोकमत न्यूज नेटवर्कपंचवटी : दोन दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाने बुधवारी दुपारी एक वाजता जोरदारपणे हजेरी लावल्याने नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली होती. पावसामुळे बुधवारी गंगाघाटावर भरणाऱ्या आठवडे बाजारात भाजीपाला खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांना तर अक्षरश: पळ काढावा लागला. केवळ पंधरा मिनिटे झालेल्या पावसामुळे पंचवटी परिसरातील काही ठिकाणच्या रस्त्यावर पाणी तुंबल्याने रस्त्याला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले असल्याचे दिसून आले.बुधवारी दुपारी एक वाजता झालेल्या पावसामुळे परिसरात असलेल्या रस्त्यावर पाणीच पाणी साचल्याने नागरिकांना या साचलेल्या पाण्यातूनच मार्गक्र मण करावे लागत होते.
मुसळधार पावसाने आठवडे बाजार जलमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 01:19 IST