शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
2
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
3
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
4
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
5
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
6
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
7
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
8
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
9
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
10
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
11
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
12
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
13
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
14
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
15
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
16
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
17
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
18
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
19
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
20
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!

वादळी पावसामुळे १५०० हेक्टरवरील मका पिकाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 16:26 IST

कळवण : तालुक्यात वादळी पावसामुळे जवळपास १५०० हेक्टर क्षेत्रावरील मका पीक भुईसपाट झाले. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी तत्काळ मकाबाधित क्षेत्रातील नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देपुनंद व चणकापूरचे जलपूजन

कळवण : तालुक्यात वादळी पावसामुळे जवळपास १५०० हेक्टर क्षेत्रावरील मका पीक भुईसपाट झाले. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी तत्काळ मकाबाधित क्षेत्रातील नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.आमदार नितीन पवार यांनी तालुक्यातील बाधित गावांतील मका पिकाची शेतात व बांधावर जाऊन पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला व नुकसानीची माहिती घेतली. तालुक्यातील मका पिकाच्या नुकसानीचे महसूल व कृषी विभागाने वस्तुनिष्ठ पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी आमदार पवार यांनी जिल्हाधिकाºयांकडे दोन दिवसांपूर्वी केली होती. तालुक्यातील बाधित गावांतील मका पिकाचे सविस्तर आणि वस्तुनिष्ठ पंचनामे झाल्यानंतर जास्तीतजास्त नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचेआश्वासन पवार यांनी पहाणी दौºयात शेतकºयांना दिले होते. तहसीलदार बी. ए. कापसे, उपविभागीय कृषी अधिकारी कैलास खैरनार, गटविकास अधिकारी डी. एम. बहिरम, तालुका कृषी अधिकारी विजय पाटील, कृषी विज्ञान केंद्राचे रूपेश खेडकर, जिल्हा परिषद सदस्य यशवंत गवळी, पंचायत समिती सभापती मीनाक्षी भोये, उपसभापती विजय शिरसाठ, राष्टÑवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे यांनी तालुक्यातील आठबे, सादडविहीर, कन्हेरवाडी, नरूळ, ओतूर, कुंडाणे, शिरसमणी, कळवण खुर्द, पिळकोस, चाचेर, भादवन, बिजोरे, ककाणे, मोकभणगी, गणोरे, शेरी, भैताणे, काठरे, सुपले, खडकी जयदर, जयदर, कोसवन, वेरुळे, करंभेळ, वडाळा, देवळीकराड, मोहपाडा, चणकापूर येथे जाऊन शेतकºयांशी संवाद साधला. वडेल येथील कृषी विज्ञान केंद्राचे रूपेश खेडकर यांनी मका व सोयाबीन नुकसानीसंदर्भात मार्गदर्शन केले. पाहणी दौºयात राजेंद्र्र भामरे, संतोष देशमुख, सुनील देवरे, विलास रौंदळ, शिवाजी चौरे, बाळासाहेब शेवाळे, हिरामण वाघ, संदीप वाघ, प्रल्हाद गुंजाळ, पंकज जाधव, शांताराम जाधव यांच्यासह शासकीय अधिकारी, कमर्चारी सहभागी झाले होते.पुनंद व चणकापूरचे जलपूजनतालुक्यात गेल्या आठवड्यापासून पावसाची रिपरिप सुरू असल्यामुळे चणकापूर आणि पुनंद धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत असून, पुनंद व गिरणा नदीला व चणकापूर उजव्या कालव्याला पूरपाणी सोडण्यात आले आहे. चणकापूर व पुनंद धरणाच्या पातळीत वाढ झाल्याने आमदार नितीन पवार व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार यांनी सपत्निक जलपूजन केले. यावेळी नारायण हिरे, लालाजी जाधव, रघू महाजन उपस्थित होते. 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी