शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
2
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
3
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
4
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
5
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
6
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
7
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
8
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
10
चंद्रपुरात भीषण अपघात! चालकाला लागलेली एक डुलकी ठरली जीवघेणी; ४ मृत्यू, ५ जण जखमी
11
UPI 'ऑटो-पे'च्या कटकटीतून सुटका! १ जानेवारीपासून लागू होणार ८ मोठे बदल; ग्राहकांचे पूर्ण नियंत्रण
12
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
13
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
14
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
15
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
16
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
17
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
18
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
19
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
20
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 01:01 IST

नाशिक : विजांचा कडकडाट आणि जोरदार वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या परतीच्या पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोपडून काढले. दुपारनंतर जिल्ह्यात एकूण १८.८६ मि.मी. इतकी पावसाची नोंद झाली, तर या पावसामुळे काही नद्यांना पुन्हा एकदा पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले तर टमाटा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

ठळक मुद्देपूरपरिस्थिती : शहरात अवघ्या दीड तासात ४० मि.मी. पाऊस

गोदेला आलेल्या पुरात वाहनेदेखील वाहून गेली.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : विजांचा कडकडाट आणि जोरदार वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या परतीच्या पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोपडून काढले. दुपारनंतर जिल्ह्यात एकूण १८.८६ मि.मी. इतकी पावसाची नोंद झाली, तर या पावसामुळे काही नद्यांना पुन्हा एकदा पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले तर टमाटा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. शेतामध्ये साचलेल्या पाण्यामुळेदेखील पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, शहरात अवघ्या दीड तासात ४० मि.मी. पाऊस झाला आहे.येत्या १४ तारखेपर्यंत जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.जिल्ह्यात सर्वदूर बरसलेल्या परतीच्या पावसाने चांगलीच दाणादाण उडवून दिली. दुपारनंतर टप्प्याटप्प्याने बरसलेल्या पाऊसधारांनी जिल्ह्यातील अनेक भागाला झोडपून काढले. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस हा येवला आणि बागलाण तालुक्यामध्ये झाला. सुमारे दीड ते दोन तास झालेल्या पावसामुळे शेतकºयांना पिकांची चिंता लागली आहे. येवला येथे ५९ मि.मी. तर बागलाणला ४४ मि.मी. पावसाची नोंद झाली. येवला तालुक्यालादेखील परतीच्या पावसाने चांगलेच झोडपून काढले असून, रविवारी झालेल्या पावसाने काही ठिकाणी घरांचे छप्पर उडाले तर पिकांचेदेखील नुकसान झाले आहे.रविवारी जिल्ह्यात सरासरी १८.८६ मि.मी. इतका पाऊस झाला असून, या हंगामात एकूण १५९३ मि.मी. इतकापाऊस नोंदला गेला आहे. यामध्ये परतीच्या पावसाची गेल्या आठ दिवसांची आकडेवारी मोठी आहे.  इगतपुरी अािण त्र्यंबकेश्वरलादेखील परतीच्या पावसाने पुन्हा एकदा दणका दिला. इगतपुरीत रविवारी ४० तर त्र्यंबकेश्वरला १३ मि.मी. पाऊस नोंदला गेला. अन्य तालुक्यांमध्ये निफाड आणि सिन्नरच्या शेतकºयांना पावसाचा फटका बसला आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत नाशिक तालुक्यात ४८ मि.मी. पावसाची नोंद झाली.धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाला नसला तरी सदर परिस्थिती पुढील आठ दिवस कायम राहणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत जिल्ह्णात धरणक्षेत्र परिसरात पाऊस झाला नसला तरी जिल्ह्णातील मध्यवर्ती भागात जोरदार पाऊस झाल्याने नद्या, नाले, ओहळांच्या पाणीपातळीत वाढ झाली. पावसानंतर सुमारे तासभर रस्त्यांवरून पाण्याचे पाट वाहत होते. यामुळे वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला. येत्या १४ तारखेपर्यंत जिल्ह्णात अनेक ठिकाणी विशेषत: घाट परिसरात जोरदार पावसाची शक्यता विर्तविण्यात आलेली आहे. दिंडोरीत झालेल्या पावसामुळे परिसरातील शेतकºयांच्या टमाटा पिकाचे नुकसान झाले आहे. वाहून गेल्याने पिंंपळगावच्या शेतकºयाचा मृत्यूपिंपळगाव बसवंत : पूरपाण्याचा अंदाज न आल्याने फरशी पुलावरून वाहून गेल्याने रामचंद्र फकिरा पवार (४५) यांचा मृत्यू झाला. पवार शनिवारी (दि.५) सायंकाळी त्यांच्या शेतातून गावात येत होते. अचानक मुसळधार पाऊस झाल्याने येथील पराशरी नदीला पूर आल्यामुळे फरशी पूलही पाण्याखाली गेला. त्यातच पाण्याचा प्रवाह वाढला. पवार यांनी पूल ओलांडण्याचा प्रयत्न केला; मात्र पाण्याच्या प्रवाहात ते वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रात्री उशिरा येथील प्राथमिक रु ग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. पोलीस निरीक्षक संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार पंडित वाघ तपास करीत आहेत.

टॅग्स :floodपूरNashikनाशिक