शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

दमदार पावसाने शेतकऱ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 14:52 IST

देवगाव : देवगाव व परिसरात तब्बल पंधरा दिवसानंतर पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे दुबार पेरणीचे संकट टळले असून शेतकऱ्यांना मोठा ...

ठळक मुद्देपंधरा दिवसानंतर हजेरी : दुबार पेरणीचे संकट टळले

देवगाव : देवगाव व परिसरात तब्बल पंधरा दिवसानंतर पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे दुबार पेरणीचे संकट टळले असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून समाधान व्यक्त केले आहे.यावर्षी जूनच्या सुरूवातीला चांगला पाउस झाल्याने देवगाव व परीसरातील शेतकºयांनी मोठ्या अपेक्षेने खरीप पिकांची पेरणी उरकली. कोरोना व लॉकडाऊनचा सामना करत पेरणीपूर्व मशागतीची कामे आटोपली. काही शेतकºयांनी हात उसनवारीने तर काहींनी पिकांच्या उत्पन्नातून बियाण्याचे पैसे देण्याचा वायदा करून तसेच काहींनी मुलांच्या शिक्षणासाठी राखून ठेवलेल्या पैश्यातून बियाण्याची खरेदी केली. पेरणीनंतर मात्र पावसाने पंधरा ते वीस दिवस पाठ फिरवल्याने पिके पिवळी पडू लागल्याने दुबार पेरणी करावी लागते की काय? या विवंचनेत शेतकºयांची चिंता वाढली होती. गेल्या काही दिवसांपासून आकाशात रोज ढग दाटून येत होते. मात्र पाऊस पडत नव्हता मात्र दोन दिवसापासून उकाडा होत होता. हवा बंद व दमट वातावरण निर्माण होऊन सकाळी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. सायंकाळी पावसाने चांगलीच हजेरी लावली.नऊ वाजेच्या दरम्यान पावसाने जोरदार हजेरी लावल्याने देवगाव व परीसरात पिकांना मोठा आधार मिळाला. या जोरदार पावसामुळे तापमानात घट होऊन हवेत गारवा निर्माण झाल्याने उष्म्याने हैराण झालेल्या नागरीकांनी सुटकेचा निश्वास सोडला. पाऊस जोरदार असल्याने पिकांवरील काही प्रमाणात अळींचा प्रादुर्भाव कमी होईल, असे मत व्यक्त करत शेतकºयांच्या चेहºयावर समाधान दिसले. यापुढे पर्जन्यमान चांगले राहून खरीप उत्पादन वाढण्याची शेतकरी वर्गास अपेक्षा आहे.चौकट...झालेल्या पावसाने प्रामुख्याने पेरणी झालेल्या सोयाबीन तसेच मका, टोमॅटो या पिकाला मोठा फायदा होणार आहे. पर्जन्यवृष्टी झाली असल्याने खरीप पिकांना आधार लाभला आहे. त्यामूळे दुबार पेरणीच्या संकटातून सुटका झाल्याने शेतकºयांना दिलासा लाभला आहे. काही भागात विहिरींना देखील पाणी उतरण्यास प्रारंभ झाला असून शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतिक्षेत आहेत.चौकट...देवगाव व परिसरात आतापर्यंत ७५ ते ८० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. उर्वरीत पेरण्यांनाही शेतकºयांनी गती दिली आहे. यावर्षी शेतकºयांनी सोयाबीन लागवडीस अधिक प्राधान्य दिले असून त्यापाठोपाठ टोमॅटो, मका, भुईमूग लागवडीकडे शेतकºयांचा कल दिसून आला आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती