शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

भोजापूर खोऱ्यात पावसाचे दमदार आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 00:30 IST

नांदूरशिंगोटे : गेल्या काही दिवसांपासून हुलकावणी दिलेल्या पावसाचे सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोऱ्यात दमदार आगमन झाले. गुरुवारी (दि.१५) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. सुमारे एक तासाहून अधिक पाऊस सुरू असल्याने शेतात सर्वत्र पाणी साचले होते. परिसरातील काही गावांमध्ये पावसाने हजेरी लावल्याने बळीराजाला दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देबळीराजा सुखावला : शेतात पाण्याचे साचले तळे

नांदूरशिंगोटे : गेल्या काही दिवसांपासून हुलकावणी दिलेल्या पावसाचे सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोऱ्यात दमदार आगमन झाले. गुरुवारी (दि.१५) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. सुमारे एक तासाहून अधिक पाऊस सुरू असल्याने शेतात सर्वत्र पाणी साचले होते. परिसरातील काही गावांमध्ये पावसाने हजेरी लावल्याने बळीराजाला दिलासा मिळाला आहे.तालुक्यातील अनेक भागात पावसाअभावी पेरण्या रखडल्या होत्या तर काही भागात पिकांना पावसाची गरज होती. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून वातावरणात उकाडा जाणवत होता. त्यामुळे सायंकाळी ५ वाजेनंतर पावसाचा जोर वाढला. भोजापूर खोरे परिसरातील चास, नळवाडी, कासारवाडी व सोनेवाडी आदी भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतात पाणी साचून तळ्याचे स्वरूप आले होते. भोजापूर खोरे हा बागायती परिसर असलेल्या भागात मोठ्या प्रमाणात भाजीपाला व नगदी पिके घेतली जातात. तसेच डाळिंब, ऊस, द्राक्ष, टोमॅटो, वांगी आदींसह खरीप हंगामातील पिकांना प्राधान्य दिले जाते. जोरदार पाऊस झालेल्या अनेक ठिकाणी शेतातील पिके पाण्याखाली गेली होती.भाजीपाला विक्रेत्यांची धावपळनांदूरशिंगोटे येथे व परिसरातही पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. सायंकाळी सहाच्या दरम्यान पावसाने जोरदार सुरुवात केली. ३५ ते ४० मिनिटे सलग पाऊस झाला. नंतर काहीवेळ रिमझिम सुरू होती. महामार्गाच्या रस्त्यांवरून पावसाचे पाणी वाहिले. सखल भागातही पाणी साचले होते. दुकाने बंद करण्याच्या वेळेलाच पाऊस सुरू झाला. त्यामुळे व्यापारी व ग्राहकांची एकच तारांबळ उडाली. रस्त्यावरील भाजीपाला व अन्य विक्रेत्यांची एकच धावपळ उडाली. 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती