शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

अभोणा परिसरात जोरदार पाऊस,पिकांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 18:23 IST

अभोणा : दोन आठवड्याच्या विश्रांतीनंतर शनिवारी (दि.२५) दुपारी ४ वाजेच्या सुमारास मेघगर्जनेसह शहर व परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली सुमारे तासभर कोसळलेल्या या पावसाने धोक्यात आलेल्या खरीपाच्या पिकांना दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देरस्त्यास ठिकठिकाणी पडलेल्या मोठ्या खड्यांमध्ये पावसाचे पाणी तुंबल्याने अपघात होण्याची भीती

अभोणा : दोन आठवड्याच्या विश्रांतीनंतर शनिवारी (दि.२५) दुपारी ४ वाजेच्या सुमारास मेघगर्जनेसह शहर व परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली सुमारे तासभर कोसळलेल्या या पावसाने धोक्यात आलेल्या खरीपाच्या पिकांना दिलासा मिळाला आहे. जूनच्या प्रारंभीच निसर्ग वादळामुळे सलग तीन दिवस पावसाने संततधार धरली होती.या पावसावर शेतकऱ्यांनी मका, बाजरी, भुईमूग, सोयाबीन पिकांची मोठया प्रमाणावर लागवड केली तर, पश्चिम आदिवासी पट्यात भात, नागलीची रोपे टाकण्यात आली होती. समाधानकारक पावसाने खरिप पिकांसह रोपेही जोमात होती. मात्र गत पंधरवाडयापासून पावसाने ओढ दिल्याने पिके वाळू लागली होती तर भात, नागलीची लावणीही लांबली त्यातच रोपेही पिवळी पडू लागल्याने हैराण झालेल्या शेतकऱ्यांची पावसाने अधिकच चिंता वाढवली. मात्र शनिवारच्या समाधानकारक पावसाने शेतकरी सुखावला आहे. दरम्यान, तालुक्यात आजपर्यंत २७९ मि मि पाऊस झाला असून शनिवारी १८ मि मी पावसाची नोंद झाली तर चणकापूर धरणक्षेत्रात २५ मि मि पाऊस झाला असून आजपर्यंत २७२ मि मि पावसाची नोंद झाली आहे आजमितीस धरणात ५२३ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. अभोणा मंडळ मध्ये ३५ मिमी पाऊस पडला.दरम्यान या पावसाने शहरातील सर्वच रस्ते जलमय झाले होते तर, गावातील सिमेंटच्या रस्त्यास ठिकठिकाणी पडलेल्या मोठ्या खड्यांमध्ये पावसाचे पाणी तुंबल्याने अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. ग्रामपालीका प्रशासनाने तात्काळ खड्डे बुजवावेत अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी