शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक शहरात दीड तास जोरदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 01:04 IST

पंधरवड्यापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नाशिककरांवर वरुणराजाची कृपादृष्टी बुधवारी (दि. २०) दुपारी झाली. अवघ्या दीड तासात २६ मि.मी. इतका पाऊस शहरात झाल्याची नोंद हवामान केंद्राने केली आहे.

नाशिक : पंधरवड्यापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नाशिककरांवर वरुणराजाची कृपादृष्टी बुधवारी (दि. २०) दुपारी झाली. अवघ्या दीड तासात २६ मि.मी. इतका पाऊस शहरात झाल्याची नोंद हवामान केंद्राने केली आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाने हजेरी लावल्याने समाधान व्यक्त होत आहे. पाणलोट क्षेत्रात २१ मि.मी. इतका पाऊस पडला.  वरुणराजा जणू नाशिककरांवर रुसला की काय अशी शंका घेतली जात होती; कारण ७ जूनच्या मध्यरात्री झालेल्या पावसानंतर मात्र पावसाने दडी मारली होती. त्यामुळे बळीराजासह सर्वच धास्तावले होते. शहरासह जिल्ह्यात पाऊस लांबल्याने चिंता व्यक्त केली जात होती. बुधवारी दुपारी दीड तास पावसाने जोरदार हजेरी लावल्याने दिलासा जरी मिळाला असला तरी सलगपणे पाऊस व्हावा, अशीच अपेक्षा नागरिक करीत आहेत.  उत्तर महाराष्टÑासह जिल्ह्यात मान्सूनच्या प्रवेशाला विलंब झाला. मान्सूनचे ढग अरबी समुद्रापासून पुढे सरकण्यास पोषक असे वातावरण तयार झालेले नसल्यामुळे पावसाची प्रतीक्षा करावी लागत होती. वाऱ्याचा वेगही शहरात प्रचंड प्रमाणात वाढल्याचा अनुभव आठवडाभरापूर्वी नाशिककरांना आला. वेगाने वाहणाºया वाºयामुळे पाऊस अधिक लांबण्याची शक्यताही वर्तविण्यात येत होती.१७ झाडे कोसळलीदीड तास झालेला जोरदार पाऊस आणि सुटलेला सोसाट्याच्या वाºयामुळे शहर व उपनगरांमध्ये एकूण १७ ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याची नोंद अग्निशामक मुख्यालयाने केली आहे. दुपारी साडेतीन वाजेपासून अग्निशामक मुख्यालयाचे दूरध्वनी खणखणू लागले. शहरातील शरणपूररोड, कॉलेजरोड, गंगापूररोड, टाकळीरोड, पंचवटी, सिडको, नाशिकरोड, इंदिरानगर आदी भागांमधून झाडे व झाडांच्या फांद्या कोसळल्याने नागरिकांकडून मदत मागण्यात आली. मुख्यालयाच्या दोन बंबांसह पंचवटी, नाशिकरोड, सिडको या उपकेंद्रांचे बंबही रस्त्यावर धावत होते. जवानांनी भर पावसात ठिकठिकाणी पडलेली झाडे हटवून मार्ग मोकळा केला. या हंगामात आतापर्यंत ३५ झाडे कोसळली आहेत.

टॅग्स :Rainपाऊस