शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

मुसळधार पावसाचा द्राक्षं, कांद्यासह अन्य पिकांना फटका; शेतकरी संकटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2019 10:20 IST

मुसळधार पावसामुळे शेतकरी संकटात

नाशिक: ज्या पावसाची बळीराजा आतुरतेने वाट पाहतो त्याच पावसामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. इडा पिडा टळो अन बळीचे राज्य येवो असे म्हटले जाते. मात्र निफाड तालुक्यात बळीराजामागे लागलेली अवकाळी पावसाची इडा पिडा काही केल्या टळेना  अशी अवस्था झाली आहे. विशेषत: तालुक्यात उगावसह अनेक ठिकाणी महत्वाचे पिक समजले जाणारे द्राक्षबाग मोठ्या संकटात सापडले आहेत.   निफाडसह परिसरातील उगांव, शिवडी, खेडे, वनसगांव, सारोळे, नांदुर्डी, सोनेवाडी नैताळे रामपूर कोळवाडी शिवरे भागात सोमवारी दिवसभर कडक‌ उन्हानंतर सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरु झाला. सुमारे सव्वा तासाहून अधिक काळ पाऊसाचा जोर होता. या पावसाचा सर्वाधिक फटका द्राक्ष उत्पादकांना बसला आहे. सद्यस्थितीत द्राक्षबागांच्या छाटणीनंतर द्राक्षबागा पोंगा व फुलोरा अवस्थेत आहे. या अवस्थेत सतत पाऊस होत असल्याने द्राक्षबागेच्या पानांवर व घडांवर करपा डावणी यासारखे रोग बळावत आहेत. तसेच फुलोऱ्यातील द्राक्षमण्यांची गळ अन घडकुज या पावसाने होत आहे. दररोज हजार दोन हजार रुपयांच्या रोगप्रतिकारक औषधांची फवारणी करायची अन पुन्हा पाऊसाने त्यावर पाणी‌ फिरवायचे हे नित्याचे झाले आहे. त्यामुळे द्राक्षबागेत सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. यातून फवारणी करण्यासाठी ट्रॅक्टर चालवणे मुश्किल होत आहे. बहुतांश वेळा दोन ट्रॅक्टरद्वारे फवारणी करावी लागत असून उत्पादक आता हतबल झाले आहेत. महिनाभरापासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे सूर्यप्रकाश न मिळाल्याने द्राक्षबागांत असलेल्या मुळ्या बंद पडत आहे. त्याचा परिणाम थेट ओलांड्यावर फांदीला मुळ्या फुटत आहे. नवीन द्राक्षमाल जिरण्याचे प्रमाणही वाढत आहे .सोमवारी सायंकाळी सुर असलेल्या पाऊसा‌ने द्राक्षबागंचे मोठे नुकसा‌न झाले आहे .निफाड व लासलगाव परीसरात निमगाव वाकडा, टाकळी विंचुर, वेळापूर, ब्राम्हणगाव विंचुर, विंचुर, भरवस, गोंदेगाव, कोटमगाव, वनसगाव, खडकमाळेगाव, सारोळेखुर्द येथे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून पंचायत समिती सदस्य शिवा सुरासे यांनी त्वरीत पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यासाठी लक्ष घालावे अशी मागणी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्याकडे केली आहे.शिवडीचे द्राक्ष उत्पादक व जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब क्षीरसागर यांनी पंचनामे लवकर व्हावेत अशी मागणी केली आहे. सततच्या पाऊसाने द्राक्षबागांवर येणाऱ्या संकटातून उत्पादकाला हातभार लावण्यासाठी‌ शासनाने केवळ पंचनाम्याचे सोपस्कार पार पाडण्यापेक्षा द्राक्ष पीक विमा योजनेत आमूलाग्र बदल घडवून आणत छाटणीनंतरच्या एकशे पन्नास दिवसापावेतो विमा संरक्षण कसे मिळेल अशी व्यवस्था निर्माण करावी असे ऊगावचे द्राक्ष बागायतदार प्रभाकर मापारी यांनी बोलताना सांगितले.