घोटी : इगतपुरी तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशीही पावसाची संततधार कायम असून, पश्चिम पट्ट्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाल्याने तालुक्यात ठिकठिकाणी वीजपुरवठाह खंडित झाला आहे. खंडित वीजपुरावठ्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.इगतपुरी, घोटी परिसरात बुधवारी (दि.२१) तिसऱ्या दिवशीही पाऊस सुरू होता. रात्रभर पावसाबरोबरच वाऱ्याचाही जोर असल्याने बहुतांश ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत होऊन घोटी, इगतपुरी बाजारपेठेतही सामसूम होती.गेल्या चोवीस तासापासून घोटी शहरासह ग्रामीण भागातही वीजपुरवठा खंडित झाल्याने अनेक व्यावसायिकांना याचा फटका बसला आहे. वाऱ्यामुळे खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित झाल्याचे सांगण्यात आले. विजेवर अवलंबून असणाऱ्या यंत्रणा, बँक, पतसंस्था, गिरण्या आदींचे काम ठप्प झाले आहे.
इगतपुरी तालुक्यात धुवाधार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 01:19 IST
घोटी : इगतपुरी तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशीही पावसाची संततधार कायम असून, पश्चिम पट्ट्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाल्याने तालुक्यात ठिकठिकाणी वीजपुरवठाह खंडित झाला आहे. खंडित वीजपुरावठ्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
इगतपुरी तालुक्यात धुवाधार पाऊस
ठळक मुद्देघोटीसह परिसरात २४ तास वीजपुरवठा खंडित