शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

थंड नाशिक तापले; कमाल तपमानाचा पारा ३६.५ अंशापर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 21:36 IST

एकेकाळी थंड वातावरणासाठी नाशिक ओळखले जात होते. उन्हाळ्यातही नाशिकचे कमाल तपमान फारसे वाढत नव्हते व उकाडा जाणवत नव्हता म्हणून मुंबईकरांना नाशिकचे आकर्षण राहत होते;मात्र काळानुरूप वाढते शहरीकरण, लोकसंख्या यामुळे वृक्षतोड व प्रदूषणामध्ये वाढ झाल्याने शहराच्या हवामानातही प्रचंड वेगाने बदल घडला आहे.

ठळक मुद्देशहराच्या हवामानातही प्रचंड वेगाने बदल तीन दिवसांत तपमान ३६.५ अंशापर्यंत जाऊन पोहचले.

नाशिक : उन्हाच्या तीव्रतेमुळे शहराच्या वातावरणात उष्मा प्रचंड वाढला असून कमाल तपमानाचा पारा ३६.५ अंशापर्यंत मंगळवारी (दि.१३) पोहचला. एकूणच वाढत्या उष्म्याने नागरिकांच्या अंगाची काहिली होऊ लागली आहे.एकेकाळी थंड वातावरणासाठी नाशिक ओळखले जात होते. उन्हाळ्यातही नाशिकचे कमाल तपमान फारसे वाढत नव्हते व उकाडा जाणवत नव्हता म्हणून मुंबईकरांना नाशिकचे आकर्षण राहत होते;मात्र काळानुरूप वाढते शहरीकरण, लोकसंख्या यामुळे वृक्षतोड व प्रदूषणामध्ये वाढ झाल्याने शहराच्या हवामानातही प्रचंड वेगाने बदल घडला आहे. शहर उन्हाळ्यात मुंबई, पुण्याच्या तुलनेने तापू लागले आहे. मार्च महिन्याचा पंधरवडा संपत असून कमाल तपमानाचा पारा ३७ अंशाच्या जवळपास आला आहे.

पुढील पंधरा दिवस सरायचे असून एप्रिल व मे महिन्यात उन्हाची दाहकतेची कल्पना करणे चिंताजनक आहे. एकूणच नाशिककरांनी आपल्या जीवनशैलीकडे अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे. शहराच्या वाढत्या तपमानामागे मानवाची जीवनशैली कारणीभूत ठरत आहे. वातानुकूलित यंत्रांचा भरमसाठ वापर, वाहनांचा वापर, प्लॅस्टिकचा वापर, वृक्ष लागवड संवर्धनाबाबत असलेली उदासिनता यामुळे शहराच्या प्रदूषणात वाढ होऊ लागली आहे. याचा परिणाम हवामानावर होत आहे. मंगळवारी शहराचे किमान तपमान १७.६ अंश इतके नोंदविले गेले. तीन दिवसांपासून शहराच्या कमाल तपमानाचा पारा चढता राहिला. ३५अंशाच्या आसपास स्थिरावरणारा पारा शनिवारपासून (दि.१०)३६ अंशाच्या पुढे सरकण्यास सुरूवात झाली. तीन दिवसांत तपमान ३६.५ अंशापर्यंत जाऊन पोहचले. गेल्या वर्षी १३ मार्च रोजी ३३ अंश इतके कमाल तपमान नोंदविले गेले होते.

टॅग्स :NashikनाशिकTemperatureतापमानHeat Strokeउष्माघात