शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

निलंबित सदस्य प्रकरणात आज सुनावणी

By admin | Updated: March 29, 2017 00:37 IST

नाशिक : गैरव्यवहार व अनियमिततेच्या आरोपात निलंबनानंतर मिलिंद जहागीरदार यांच्यासह तिन्ही सदस्यांनी दिवाणी न्यायालय व धर्मादाय आयुक्तांकडे केलेल्या याचिकेची सुनावणी अंतिम टप्प्यात आहे.

सावाना गैरव्यवहार प्रकरण : धर्मादाय आयुक्त,  दिवाणी न्यायालयाच्या निकालाकडे नाशिककरांचे लक्ष नाशिक : सार्वजनिक वाचनालयात गैरव्यवहार व अनियमिततेच्या आरोपात निलंबनानंतर मिलिंद जहागीरदार यांच्यासह तिन्ही सदस्यांनी दिवाणी न्यायालय व धर्मादाय आयुक्तांकडे निलंबन मागे घेण्यासाठी केलेल्या याचिकेची सुनावणी अंतिम टप्प्यात असून, बुधवारी (दि.२९) या प्रकरणाचा निकाल येणाची शक्यता आहे. या निकालानंतर निलंबित तिन्ही सदस्यांना सावानाच्या निवडणुकीत मतदान करता येणार किंवा नाही याकडेही नाशिककरांचे लक्ष आहे.  सार्वजनिक वाचनालयाच्या नूतनीकरणाच्या आणि सुशोभीकरणाच्या कामात अनियमितता व गैरव्यवहाराच्या आरोपात सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर यांच्याकडून तत्कालीन कार्यवाह मिलिंद जहागीरदार, कार्याध्यक्ष विनया केळकर व अर्थसचिव स्वानंद बेदरकर यांचे निलंबन करण्यात आल्यानंतर सदर निलंबित सदस्यांनी त्यांचे निलंबन रद्द करून त्यांना मतदानाचा हक्क मिळावा, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु, उच्च न्यायालयाने या प्रकरणी धर्मादाय आयुक्तांकडे याचिका दाखल करण्याचे निर्देश दिल्याने हे प्रकरण धर्मादाय आयुक्तासमोर सादर करण्यात आले. त्यानंतर धर्मादाय आयुक्तांसमोर दोन्ही पक्षांनी त्यांचे म्हणणे मांडले असून, आता दिवाणी न्यायालय व धर्मादाय आयुक्तालयत दाखल असलेल्या दोन्ही याचिकांवर आज अंतिम निकाल येणाची शक्यता असल्याने या निकालाकडे सावानाच्या वाचकवर्गासह संपूर्ण नाशिकरांचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान, या प्रकरणान न्यायालयात निर्णय प्रलंबित असताना दोन्ही पक्षांकडून आरोप-प्रत्यारोप होत असून, जहागिरदार यांनी औरंगाबादकर यांच्यावर सर्वसाधारण सभेत वास्तूविशारद अनिल चोरडिया यांचा अहवाल सोयीने मांडून सभासदांची दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे. (प्रतिनिधी)सावानाचे अध्यक्ष विलास औरंगाबादकर यांनी गेले सहा महिने वाचनालयात चालविलेला बेकायदेशीर कारभार निव्वळ खोटारडेपणावर आधारलेला आहे. वास्तूविशारद अनिल चोरडिया यांनी कोणतीही शहानिशा न करता एकतर्फीपणे दिलेला अहवालही औरंगाबादकर यांनी सोयीने मांडून वाचक, सभासद आणि नाशिककरांची दिशाभूल केलेली आहे.- मिलिंद जहागिरदार,  निलंबित सदस्य, सावाना मिलिंद जहागीरदार यांच्या आरोपात कोणतेही तथ्य नाही. अनिल चोरडिया यांनी चार अभियंत्यांना सोबत घेऊन बांधकामाचे शास्त्रशुद्धरीत्या परीक्षण व मूल्यांकन केले आहे. त्यांनी तांत्रिकदृष्ट्या सक्षम पुराव्यांसह अहवाल सादर केला आहे. या अहवालाविषयी जहागीरदार यांच्या मनात कोणतीही साशंकता असल्यास त्यांनी सरकारी मान्यता प्राप्त वास्तुविशारदांकडून बांधकाम आणि अहवालातील अधोरेखित मुद्द्यांची फेरपडताळणी करावी. त्यासाठीही आम्ही तयार आहोत. - विलास औरंगाबादकर,  अध्यक्ष, सावाना