शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

नाशिककरांच्या याचिकेवर आज सुनावणी शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 01:59 IST

मराठवाड्याला पाणी सोडण्यास विरोध करण्यासाठी उच्च न्यायालयात विविध दोन याचिकांवर तातडीने बुधवारीच (दि. २४) सुनावणी करण्यास न्यायमूर्तींनी दिवाळीनंतर सुनावणी घेण्याचे सकाळी सांगितले तथापि, तातडीची बाब दुपारी पुन्हा निदर्शनास आणून दिल्यानंतर न्यायमूर्तींनी गुरुवारी (दि. २५) बघू असे सांगितल्याने आता गुरुवारी सकाळीच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

नाशिक : मराठवाड्याला पाणी सोडण्यास विरोध करण्यासाठी उच्च न्यायालयात विविध दोन याचिकांवर तातडीने बुधवारीच (दि. २४) सुनावणी करण्यास न्यायमूर्तींनी दिवाळीनंतर सुनावणी घेण्याचे सकाळी सांगितले तथापि, तातडीची बाब दुपारी पुन्हा निदर्शनास आणून दिल्यानंतर न्यायमूर्तींनी गुरुवारी (दि. २५) बघू असे सांगितल्याने आता गुरुवारी सकाळीच सुनावणी होण्याची शक्यता आहे.  मराठवाड्यातील जायकवाडी धरणात ६५ टक्के उपयुक्त जलसाठा करण्यासाठी जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने नााशिक आणि अहमदनगर जिल्ह्णातील धरणातून पाणी सोडण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्णातील गंगापूर, दारणा आणि पालखेड या तीन धरण समूहातून सुमारे साडेतीन टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यास नाशिक जिल्ह्णातून विरोध होत आहे. विशेषत: यंदा परतीच्या पावसाने दगा दिल्याने नाशिक जिल्ह्णातील आठ तालुक्यांत गंभीर परिस्थिती आहे. शिवाय धरणात आजमितीला ७७ टक्के इतका सरासरी साठा आहे. अशावेळी मराठवाड्याला पाणी सोडणे म्हणजे नाशिककरांवर अन्याय करण्यासारखे असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील भाजपाचे कार्यकर्ते गोपाळ पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यात गोदावरी नदीच्या ऊर्ध्व भागातील पाणी साठ्याचा विचार करून  अन्याय होऊ देऊ नये तसेच २०१६ मध्ये उच्च न्यायालयानेच धरणांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश सहा महिन्यांत करण्याचे आदेश शासनाला दिले होते; मात्र त्याची अंमलबजावणी झाली नसून ती करावी यासह अन्य मागण्यांसाठी ही याचिका होती तर गंगापूर धरणातून बाधित होत असल्याने निफाड येथील शेतकरी अशोक दगू निफाडे यांनीदेखील याचिका दाखल केली आहे.या दोन्ही याचिकांवर तातडीची सुनावणी व्हावी यासाठी न्या. गवई आणि कर्णिक यांना विनंती करण्यात आली होती; मात्र सकाळी त्यांनी यावर आता सुनावणी होणार नाही तर दिवाळीनंतर सुनावणी होईल असे सांगितले. दरम्यान, दुपारी पुन्हा एकदा अ‍ॅड. साखरे आणि अ‍ॅड. प्रवर्तक पाठक यांनी याचिकेवरील सुनावणी तातडीची आहे, असे निदर्शनास आणून दिले असता न्यायमूर्तींनी गुरुवारी (दि. २५) सकाळी ठरवू असे सांगितले. त्यामुळे आता गुरुवारी यासंदर्भात सुनावणी होण्याच्या दृष्टीने आशा पल्लवित झाल्या आहेत.

टॅग्स :WaterपाणीNashikनाशिक