शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य अधिकाऱ्यांच्या दालनाला ‘कॅमे-या’चे कवच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 20:12 IST

तालुका वैद्यकीय अधिका-याकडे डॉ. डेकाटे यांनी पैसे मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे करण्यात आल्याने डेकाटे यांच्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सापळाही रचला होता. त्यात डेकाटे प्रत्यक्ष सापळ्यात अडकले नसले तरी

ठळक मुद्देजिल्हा परिषद : कथित लाच प्रकरणानंतर विशेष खबरदारी

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : आठ महिन्यांपूर्वी आरोग्य विभागातील उत्कृष्ट काम करणा-या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सत्कार समारंभाच्या निमित्ताआड तालुका वैद्यकीय अधिका-याकडे लाच मागितल्याच्या कथित आरोपानंतर गुन्हा दाखल झालेले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनी या घटनेनंतर झालेली ससेहोलपट व आरोग्य खात्याची बदनामी टाळण्यासाठी आरोग्य विभागात सीसीटीव्ही कॅमे-याचे कवच बसविल्याने सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे. विशेष म्हणजे डेकाटे यांनी स्वत:च्या दालनातदेखील एक कॅमेरा बसवून स्वत:लाही त्यापासून दूर ठेवलेले नाही.

जून महिन्यात सदरचा प्रकार घडला होता. तालुका वैद्यकीय अधिका-याकडे डॉ. डेकाटे यांनी पैसे मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे करण्यात आल्याने डेकाटे यांच्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सापळाही रचला होता. त्यात डेकाटे प्रत्यक्ष सापळ्यात अडकले नसले तरी, त्यांनी पैसे मागितल्याचे ध्वनिमुद्रित पुरावा हाती लागल्याने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र त्यांना अटक होवू शकली नाही. आरोग्य विभागात उत्कृष्ट काम करणा-या अधिकारी, कर्मचा-यांच्या सत्कार सोहळ्यासाठी येणा-या खर्चाची तजवीज करण्यासाठीच वर्गणी गोळा केली जात असल्याचे डेकाटे यांचे म्हणणे होते. डॉ. डेकाटे यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केल्यानंतर साधारणत: चार ते सहा महिन्यांनी ते जिल्हा परिषदेच्या सेवेत पुन्हा सहभागी झाले. या साºया प्रकारातून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला बदनामीला सामोरे जावे लागले, तर खुद्द डॉ. डेकाटे यांनाही मनस्ताप झाला. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणीही सुरू केली आहे. आरोग्य विभागात येणाºया प्रत्येक व्यक्तीची नोंद ठेवण्यासाठी आरोग्य विभागाच्या प्रवेशद्वारावरच कॅमेरा लावण्यात आला असून, कार्यालयातही महत्त्वाचे टेबल एकाच टप्प्यात येतील अशा पद्धतीने कॅमे-याची ‘नजर’ ठेवण्यात आली आहे. डॉ. डेकाटे यांनी आपल्या स्वत:च्या दालनातदेखील कॅमेरा कार्यान्वित ठेवला असून, दालनातील सा-या बारिकसारिक गोष्टीची त्याचबरोबर होणा-या चर्चेचीदेखील दखल त्याद्वारे घेण्यात येईल. ही सर्व कॅमेरे व त्याचे नियंत्रण डेकाटे यांनी आपल्याकडेच ठेवले आहे. डेकाटे यांनी कॅमे-याचा खर्च शासनाच्या कोणत्या हेडखाली केला हे समजू शकले नसले तरी, आरोग्य विभागातील कर्मचारी सोमवारी टेबलावर व्यवस्थित हजर असल्याचे आढळून आले.

टॅग्स :zpजिल्हा परिषदnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद