येवला : येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा समारोप पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते झाला. शिबिरास गरजूंनी चांगला प्रतिसाद दिला. सिक्स सिग्मा हॉस्पिटल्स, राजीव गांधी आरोग्य जीवनदायी योजना व राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी, यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवस शिबिर चालू होते.