शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

शहरात सर्पांनी काढले डोके वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:31 IST

कधी अंगणात, कधी वाहनाच्या डिक्कीमध्ये तर कधी चारचाकीच्या बोनटमध्ये अन् कचºयाच्या डब्यातसुध्दा सध्या सर्प आढळून येत असल्याचे ‘कॉल’ शहर व परिसरातून वाढले आहेत. बदलते तपमान आणि आॅक्टोबरमधील उन्हाच्या तीव्रतेने जमिनीखाली उष्णता वाढली आहे. सुरक्षित जागा शोधण्यासाठी शहरात सापांनी बिळांमधून डोके वर काढण्यास सुरुवात केल्याने नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे.

अझहर शेख ।नाशिक : कधी अंगणात, कधी वाहनाच्या डिक्कीमध्ये तर कधी चारचाकीच्या बोनटमध्ये अन् कचºयाच्या डब्यातसुध्दा सध्या सर्प आढळून येत असल्याचे ‘कॉल’ शहर व परिसरातून वाढले आहेत. बदलते तपमान आणि आॅक्टोबरमधील उन्हाच्या तीव्रतेने जमिनीखाली उष्णता वाढली आहे. सुरक्षित जागा शोधण्यासाठी शहरात सापांनी बिळांमधून डोके वर काढण्यास सुरुवात केल्याने नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे.सर्प हा थंड रक्ताचा सरपटणारा प्राणी असून, थंडीची चाहूल लागताच सर्पांच्या वागणुकीत बदल होतो. वाढत्या थंडीमध्ये सर्प जास्त करून मोकळ्या वातावरणात येण्याचे टाळतो; मात्र तत्पूर्वी पुरेशा खाद्याच्या शोधात आणि जमिनीखाली मुरलेल्या पाण्याची उष्णतेमुळे होणाºया वाफेपासून बचावासाठी सर्प बिळं सोडतात. यामुळे शहरातील विविध उपनगरीय परिसरांमध्ये सर्पांनी डोके वर काढले असून रहिवासी भागात सापांचा वाढता सुळसुळाट नागरिकांमध्ये भीती निर्माण करणारा ठरत आहे.  नागरिकांनी सर्प दिसल्यास त्याला धोका पोहचविण्याचा प्रयत्न करू नये. या महिन्यात सर्प रेस्क्यू करणाºया संस्थांना सातत्याने विविध भागांमधून सर्प निघाल्याचे ‘कॉल’ येत असून, रेस्क्यू केलेल्या सर्पांचा वनविभागामधील नोंदीचा आकडाही वाढला आहे. रेस्क्यू केलेल्या सापांच्या नोंदी वनविभागाकडे करणे सर्पमित्रांना बंधनकारक आहे....अन्यथा सर्पमित्रांसह नागरिकांवरही गुन्हाशहरातील विविध रहिवासी भागांमध्ये आढळून येणारे सर्प रेस्क्यू करताना वन्यजीव कायद्याचे पालन करणे सर्पमित्रांवर बंधनकारक ठरते. सर्पासोबत फोटो काढणे, तसेच सदर फोटो सोशल मीडियाद्वारे पसरविणे आणि पकडलेले सर्प हे तत्काळ नैसर्गिक अधिवासात मुक्त न करणे, पकडलेल्या सर्पांसोबत नागरिकांनी फोटो काढणे आदी कृत्यातून वन्यजीव संवर्धन कायद्याचा भंग होऊन सेशन-९ नुसार सर्पमित्र व संबंधित नागरिक शिक्षेस पात्र ठरू शकतात. यामुळे सर्पमित्रांकडे पकडलेल्या सापांसोबत छायाचित्र काढण्याचा हट्ट कोणीही करू नये अथवा त्यांच्यावर दबावही आणू नये, तसेच सर्पमित्रांनीही सतर्क रहावे, असे आवाहन वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत खैरनार यांनी केले आहे.महिनाभरात ४७ सापांची वनविभागात नोंद४शहरात महिनाभरात सुमारे ४७ सर्प विविध भागांमधून रेस्क्यू करण्यात आल्याची माहिती इको-एको वन्यजीव संस्थेच्या वतीने देण्यात आली. या संस्थेने रेस्क्यू केलेल्या सर्पांची नोंदणी वनविभागाच्या कार्यालयात करण्यात आल्याचे वन परिमंडळ अधिकारी रवींद्र सोनार यांनी सांगितले.  वनविभागाकडे या महिन्यात सुमारे ५० ते ५५ सर्पांची नोंदणी झाली आहे. वनकर्मचाºयांना सर्प पकडण्याचे प्रशिक्षण दिले जात नाही, त्यामुळे वनविभागाकडून सर्पमित्रांची मदत घेऊन सर्प ‘रेस्क्यू’ केले जातात. यासाठी संबंधित सर्पमित्रांना विविध नियम व अटी-शर्तींचे पालन करत समाजकार्य क रणे बंधनकारक असते.