शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सेतू अभियानाचे काम सांगितल्यानेमुख्याध्यापकांना केली मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2021 23:02 IST

कळवण : शिक्षण सेतू अभियानाचे काम मुख्याध्यापकांनी सांगितल्याचे त्याचा राग आल्याने विसापूर येथील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेतील प्राथमिक शिक्षक अनिल देसले यांनी मुख्याध्यापक यांना मारहाण केली केल्याची घटना घडली असून या प्रकरणी शासकीय कामात अडचण निर्माण करणे व मुख्याध्यापकांना मारहाण केल्याच्या कारणावरून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचे प्रकल्पाधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी विकास मीना यांनी देसले यांना निलंबित केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देकळवण : कामात अडथळा केल्याप्रकरणी प्राथमिक शिक्षक निलंबित

कळवण : शिक्षण सेतू अभियानाचे काम मुख्याध्यापकांनी सांगितल्याचे त्याचा राग आल्याने विसापूर येथील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेतील प्राथमिक शिक्षक अनिल देसले यांनी मुख्याध्यापक यांना मारहाण केली केल्याची घटना घडली असून या प्रकरणी शासकीय कामात अडचण निर्माण करणे व मुख्याध्यापकांना मारहाण केल्याच्या कारणावरून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचे प्रकल्पाधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी विकास मीना यांनी देसले यांना निलंबित केल्याची माहिती सूत्रांनी दिली.कळवण तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा विसापूर येथील मुख्याध्यापक यांनी याबाबत एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्पाधिकारी कळवण तथा सहाय्यक जिल्हाधिकारी विकास मीना यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रारीत केली आहे. त्यात नमूद केले आहे की, शासनाच्या निर्देशानुसार नव्याने अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेल्या शिक्षण सेतू अभियानाचे सर्व शिक्षक वर्गात समसमान वाटप करण्यात आले आहे.प्राथमिक शिक्षक अनिल देसले यांनाही सेतू अभियानचे काम देण्यात आले आहे. ते त्यांच्या कामात टाळाटाळ करीत असल्याने त्यांना हे काम करण्यास सांगितले असता त्यांनी अरेरावीची भाषा वापरून हे काम माझे नसून मी ते करणार नाही, असे सांगत मुख्याध्यापकांना शाळेत शासकीय कामकाज करीत असताना लाथा बुक्यांनी मारहाण केली तसेच दोनवेळा टेबल लोटून दाबून धरले इतर सहकारी शिक्षकांनी त्यांना पकडून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी इतर सहकाऱ्यांना मला सोडा आज मी याला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. या प्रकरणी मुख्याध्यापकांनी या शिक्षकावर तात्काळ कारवाई करावी अशी लेखी स्वरूपात तक्रार केली आहे.या संदर्भात प्रकल्प अधिकारी मीना यांनी तक्रारीची दखल घेऊन प्राथमिक शिक्षक अनिल देसले प्रथमदर्शनी कर्तव्यात कसूर केल्याचे आढल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. शिवाय त्यांना शासकीय आश्रमशाळा, भोरमाळ, ता. सुरगाणा हे मुख्यालय देण्यात आले असून मुख्यालय सोडण्यापूर्वी मुख्याध्यापकांची परवानगी घेणे बंधनकारक केले असल्याचे समजते.कोट...माझ्या सेवानिवृत्तीला अवघे ५६ दिवस बाकी आहेत . त्यामुळे शिक्षक देसले पासूनमाझ्या जीवितास धोका आहे. त्यांनी मारहाण केल्याने माझ्या डोळ्यास इजा झाली आहे.- मुख्याध्यापक

 

 

टॅग्स :Teacherशिक्षकCrime Newsगुन्हेगारी