शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
4
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
5
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
6
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
7
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
8
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
9
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
10
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
11
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
12
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
13
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
14
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
15
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
16
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
17
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
18
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
19
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
20
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव

कर्ज वसुली शेतकऱ्यांची डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 18:43 IST

देवगाव : सलग चार वर्षांपासून होणारी गारपीट, अवकाळी पाऊस अन् मागील वर्षी शेतमालाचे कोसळलेले बाजार भाव यामुळे शेतकरी हतबल झालेला असताना आता थकित कर्ज वसुलीसाठी जिल्हा बँकेची धडक मोहीम हाती घेत जप्तीची कारवाई सुरू केल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.

ठळक मुद्देजिल्हा बँक सक्त कर्ज वसुली विरोधात प्रांत, तहसीलदारांना निवेदन

देवगाव : सलग चार वर्षांपासून होणारी गारपीट, अवकाळी पाऊस अन् मागील वर्षी शेतमालाचे कोसळलेले बाजार भाव यामुळे शेतकरी हतबल झालेला असताना आता थकित कर्ज वसुलीसाठी जिल्हा बँकेची धडक मोहीम हाती घेत जप्तीची कारवाई सुरू केल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.दुष्काळी भागात थकित कर्ज वसुलीसाठी सक्तीची कारवाई करु नये असे शासन निर्णय असताना या आदेशाला केराची टोपली दाखवत जिल्हा बँकेचे अधिकारी सक्तीची कर्ज वसुली करण्यात मग्न आहेत. विशेष म्हणजे या कर्ज वसुलीसाठी अगदी शेतकऱ्यांंना धमकावून थेट स्थावर मालमत्ता लिलाव करण्याचे नोटीसीत नमूद केल्याने दुष्काळी काळात कर्ज कसे भरायचे असा अवघड पेच शेतकºयांपुढे उभा ठाकला आहे.निफाड तालुक्यात सन २००९, २०१०, २०१३, २०१४ मध्ये झालेल्या गारपीटीमुळे शेतकºयांचे द्राक्षबागेसह ऊस, कांदा,गहु,हरभरा आदी शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी शासनाने या पिकाचे पंचनामे करत तुटपुंजी मदत दिली होती, मात्र त्यानंतर वाढते विजेचे भारनियमन आणि शेतीमालाचे कोसळते बाजारभाव यामुळे शेती पिकांवरचा खर्च वाढला, मात्र उत्पादन घटले. त्याचा थेट परिणाम म्हणून शेतकºयांचे आर्थिक नियोजन कोलमडले शेतीसाठी काढलेले कर्ज थकत होत गेले.चौकट....महसूल मंडळातील सर्व गावे दुष्काळी घोषित करून तेथील शेतकरी विद्यार्थी यांना काही सवलती दिल्या आहेत माञ शासनाचे हे आदेश पायदळी तुडवत जिल्हा बँकेची कर्जाची धडक वसुली सुरू असल्याने यातील काही थकबाकीदार शेतकºयांचे रक्तदाब वाढणे तसेच ते शेतकरी दुर्धर रोगाने आजारी आहे अशा कुटुंबाचे स्वास्थ्य बिघडणे असे प्रकार घडु लागेल आहेत. त्यातच जिल्हा बँकेचे जे बडे थकबाकीदार आहे.त्यांच्याकडील वसुली प्रथम करणे गरजेचे असताना ज्यांच्याकडे लाख, दोन लाख रु पये कर्ज आहे, अशा शेतकºयांचे उंबरठे दररोज झजविले जात आहे. साहजिकच या कारवाईत अधिकाºयांकडून होणारा दुजाभाव दिसुन येते असून बँकेने राबविलेली सक्तीची कर्ज वसुली त्वरित थांबवून शेतकºयांना दिलासा द्यावा. यासाठी शेतकºयांनी प्रांत, तहसीलदार, सहाय्यक निबंधक, पोलिस निरिक्षक यांना निवेदन दिले.याप्रसंगी शिरवाडे उपसरपंच संदिप आवारे, रमेश बडवर, प्रमोद बडवर, विलास शिंदे, प्रशांत कुलकर्णी, कानळद सरपंच गणेश जाधव, रामनाथ बडवर, साहेबराव बडवर, सुरेश शेळके, प्रंशात कुलकर्णी, दत्तात्रय कुलथे, बाळु निलख आदी उपस्थित होते.