शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

घरातून दोन तोळ्याचा सोन्याचा हार लांबविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 00:22 IST

नाशिकरोड : जयभवानीरोड फर्नांडिसवाडी येथे एका अनोळखी इसमाने महिलेच्या घरी जाऊन ‘तुमचे कर्ज प्रकरण मंजूर झाले आहे’ असे सांगून विश्वास संपादन करत दोन तोळे वजनाचा सुमारे ७० हजारांचा सोन्याचा हार ताब्यात घेत फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देक र्ज मंजुरीचे आमिष : तारण म्हणून घेतला ताबा

नाशिकरोड : जयभवानीरोड फर्नांडिसवाडी येथे एका अनोळखी इसमाने महिलेच्या घरी जाऊन ‘तुमचे कर्ज प्रकरण मंजूर झाले आहे’ असे सांगून विश्वास संपादन करत दोन तोळे वजनाचा सुमारे ७० हजारांचा सोन्याचा हार ताब्यात घेत फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.फर्नांडिसवाडीतील अलमास इक्बाल शेख यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, शुक्र वारी (दि.११) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास त्या घरी एकट्या असताना एक अनोळखी इसम आला. इक्बाल शेख येथेच राहतात का, अशी विचारणा केली. अलमास यांनी पती कामावर गेल्याचे सांगितले. अनोळखी व्यक्तीने अलमास यांच्याकडून इकबाल यांचा फोन नंबर घेत इकबाल यांना फोन लावून बोलण्याचा बहाणा केला. ‘तुमचे कर्जप्रकरण मंजूर झाले आहे, त्यासाठी तारण म्हणून सोन्याची वस्तू दाखवावी लागेल. सोबत मॅडम आल्या आहेत. त्या सोन्याची वस्तू बघून कर्जाचा चेक देतील,’ असा त्याने बनावट संवाद साधला. त्या इसमाने आपले नाव जावेद शेख असल्याचे सांगितले. अलमास यांना तुमच्या पतीसोबत बोलणे झाले असल्याचे त्याने सांगितले. घरात सोन्याची वस्तू नसल्याचे अलमास यांनी सांगितल्यावर तो अनोळखी इसम म्हणाला की, तुमचे पती इकबाल यांनी सांगितले आहे की, घरी सोन्याचा हार आहे, तो द्यावा अलमास यांनी विश्वास ठेवून इसमाला दोन तोळ्याचा सोन्याचा हार दिला. तीन कप चहा ठेवा मी मॅडमला घेऊन येतो असे सांगून इसम बाहेर गेला. अलमास त्याच्यामागे पळाल्या. तथापि, तो इसम मोटरसायकलवर बसून फरार झाला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस