शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
4
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
5
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
6
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
7
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
8
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
9
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
10
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
11
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
12
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
13
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
14
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
15
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
16
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
17
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
18
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
19
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
20
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा

अन्न पाण्याच्या शोधार्थ हरणाची भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 17:54 IST

राजापूर : राजापूर व परिसरात मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी काळवीट व हरणांच्या संकेत समाधानकारक वाढ झाली असून ममदापूर संवर्धन राखीव झाल्यानंतर त्यांच्या मृत्यूच्या प्रमाणात देखील घट झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

ठळक मुद्देराजापूर : यावर्षी काळवीट व हरणांच्या संकेत समाधानकारक वाढ

राजापूर : राजापूर व परिसरात मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी काळवीट व हरणांच्या संकेत समाधानकारक वाढ झाली असून ममदापूर संवर्धन राखीव झाल्यानंतर त्यांच्या मृत्यूच्या प्रमाणात देखील घट झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.दरम्यान यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे राजापूर व परिसरातील काही प्रमाणात अन्न पाण्याच्या शोधासाठी भटकंती करण्याची वेळ हरणांवर आली आहे. राजापूर वन विभागाला मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र लाभले असून या परिसरात राजापूर, ममदापुर, सोमठाणजोश, खरवंडी, देवदरी, रेंडाळा, कोळगाव आदी गावांचा समावेश होतो.या आठ गावातील मिळून साडेसात हजार वनक्षेत्र असून यापैकी साडेपाच हजार हेक्टर क्षेत्रावर ममदापुर राखीव हा प्रकल्प तयार केला आहे. यामध्ये राजापूर, ममदापुर, खरवंडी, देवदरी, सोमठाणजोश या पाच गावांचा वन क्षेत्राचा समावेश असून प्रत्येक गावात पशुपक्ष्यांच्या संरक्षणासाठी २०१४ मध्ये पथके निर्माण केली. त्यामुळे हरणांच्या व काळविटांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.राजापूर व परिसरात हरणांची संख्या ही जास्त असल्याने दुष्काळी परिस्थितीचा सामना हरिण व काळविटांना करावा लागत आहे. पाण्याच्या शोधासाठी भटकंती करण्याची वेळ हरणावर आली आहे.आत्तापर्यंत विहिरींना कठडे नसल्यामुळे अनेक हरण दगावल्याच्या घटना या परिसरात घडल्या आहेत. त्यांच्या बजावाकरीता वन संवर्धनाच्या नावाखाली लाखो रुपये खर्च वन विभागाने केले आहे.हरणाना पिण्याच्या पाण्यासाठी त्यांनी ठीक ठिकाणी पानवठे तयार करण्यात आली असून त्यामध्ये उन्हाळ्यात टँकरद्वारे पाणी सोडण्यात येत,े तर राजापूर येथील पानवठ्यात पाणी भरण्यासाठी सौर उर्जेवरील पंप बसविण्यात आल आहे. त्याने दररोज पाणी त्यात भरण्यासाठी बोरवेल घेण्यात आला आहे, व त्यामधून पाणी काढण्यात येते संवर्धन झाल्यानंतर हरणासाठी गवताची लागवड करण्यात आली असून भविष्यात जंगलात निवारा शेड व वेगवेगळ्या जातीच्या गवताची लागवड करण्यात येणार आहे. तसेच शिकार थांबण्यासाठी रस्त्यावर चेक पोस्ट उभारण्यात येणार आहे.सध्या दुष्काळी परिस्थिती जास्त असल्याने अन्न, पाण्याच्या शोधासाठी हरणांना रानोमाळ भटकंती शिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही वन विभागाने ठिकठिकाणी कुंड्या ठेवून पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

सन २०१८ मध्ये राजापूर परिक्षेत्रातील हरिण आणि काळविट यांची संख्या १४२० झाली आहे. येवला तालुक्यातील हरिण आणि काळवीटाची संख्या २४७५ च्या वर पोहचली आहे. अन्न व पाण्याच्या शोधासाठी काही हरिण देखील स्थालांतरित झाले असल्याचा अंदाज वनविभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे. राजापूर परिसरात सगळी शेतीची नांगरट झाली असल्याने हरणांना खाण्यासाठी काहीच नाही. त्यामुळे हरणाचे कळप भटकंती करताना दिसत आहेत.