खेडगाव मध्ये कोरोनाचा कहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 06:33 PM2020-09-21T18:33:02+5:302020-09-21T18:34:32+5:30

खेडगाव : मागील पाच ते सहा दिवसात खेडगाव मध्ये १२ रुग्ण पॉझिटिव्ह सापडले असून रविवारी (दि.२०) दिवसभरात खेडगावमध्ये आठ रुग्ण सापडले असून मागील पाच महिन्यात एकाच दिवशी एवढे रुग्ण सापडण्याची ही पहिलीच वेळ असून त्या रुग्णांच्या संपर्कातील एकूण ३८ नातेवाईक विलगिकरण केंद्रात अ‍ॅडमिट आहेत.

Havoc of Corona in Khedgaon | खेडगाव मध्ये कोरोनाचा कहर

खेडगाव येथे माझे कुटूंब माझी जबाबदारी या योजने अंतर्गत गावातील ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी याची तपासणी करताना प्राथमिक केंद्राचे आरोग्य अधिकारी कर्मचारी आशा सेवक व अंगणवाडी सेविका.

Next
ठळक मुद्देगावात सर्वच नागरिकांनी मास्क हा कम्पलसरी वापरला पाहिजे

खेडगाव : मागील पाच ते सहा दिवसात खेडगाव मध्ये १२ रुग्ण पॉझिटिव्ह सापडले असून रविवारी (दि.२०) दिवसभरात खेडगावमध्ये आठ रुग्ण सापडले असून मागील पाच महिन्यात एकाच दिवशी एवढे रुग्ण सापडण्याची ही पहिलीच वेळ असून त्या रुग्णांच्या संपर्कातील एकूण ३८ नातेवाईक विलगिकरण केंद्रात अ‍ॅडमिट आहेत. आता तरी खेडगाव व परिसरात सामूहिक संसर्गास सुरवात झाली असून नागरिकानी व सर्वच व्यावसायिक बांधवांनी काळजी घेतली पाहिजे तसेच गावात सर्वच नागरिकांनी मास्क हा कम्पलसरी वापरला पाहिजे मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईचे आदेश ग्रामपंचायत प्रशासनाने दिले असून खास करून व्यावसायिक बंधूनी जास्त काळजी घेण्याचे आवाहन प्राथमिक केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. बेडस्कर, सहाययक अधिकारी डॉ. पवार, ग्रामविकास अधिकारी सोमनाथ ढोकरे, आरोग्य सेवक कमलेश मगर यांनी केली आहे.
तसेच संपूर्ण गावात माझे कुटुंब माझी जबाबदारी या योजनेअंतर्गत सर्व अधिकारीवर्गाच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी सेविका आशा वर्कर यांच्या कडून तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी तसेच ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी गावातील प्रत्येक नागरिकांची तपासणी करत आहे. नागरिकांनी ह्या मोहिमेस सहकार्य करावे अशी आपेक्ष अधिकारी वर्गाने केली आहे. लवकरच गाव पुन्हा एकदा कोरोना मुक्त करण्यासाठी त्यांनी आव्हान केले आहे. सर्व नागरिकांनी गरज असेल तेव्हाच बाहेर पडावे व मास्क असल्याशिवाय बाहेर पडू नये.


 

Web Title: Havoc of Corona in Khedgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.