शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

दवबिंदूमुळे पिके धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 15:48 IST

पाटोदा :  येवला तालुक्यात चार पाच दिवसाच्या कडाक्याच्या थंडीनंतर दोन दिवस ढगाळ वातावरण तर सोमवार आणि मंगळवारी हवेत दिवसभर वाऱ्याच्या झुळकीबरोबर प्रचंड गारवा तसेच पहाटे मोठया प्रमाणात पडलेल्या दवबिंदूमुळे पिकांवर दवाची चादर पसरत असल्याने पिके सडू लागली असून त्यांची वाढ खुंटल्याने रब्बी हंगामातील संपूर्ण पिके धोक्यात आली आहे.

पाटोदा :  येवला तालुक्यात चार पाच दिवसाच्या कडाक्याच्या थंडीनंतर दोन दिवस ढगाळ वातावरण तर सोमवार आणि मंगळवारी हवेत दिवसभर वाऱ्याच्या झुळकीबरोबर प्रचंड गारवा तसेच पहाटे मोठया प्रमाणात पडलेल्या दवबिंदूमुळे पिकांवर दवाची चादर पसरत असल्याने पिके सडू लागली असून त्यांची वाढ खुंटल्याने रब्बी हंगामातील संपूर्ण पिके धोक्यात आली आहे. या सततच्या बदलत्या हवामांमुळे पिकांवर विविध रोगांचे आक्र मण वाढल्याने खरीपा पाठोपाठ रब्बी हंगाम वाया जाण्याची भीती निर्माण झाल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.सोमवारी पहाटे तर मोठया प्रमाणात धुके पडले तर दिवसभर हवेत गारवा असल्याने दिवसभर हुडहुडी जाणवत होती. या रोजच्या बदलत्या वातावरणामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी, मका,कांदे या पिकांवर मोठया प्रमाणावर मावा तसेच मर रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. तर कांदा पिकावर माव्याबरोबरच करपा वाढल्याने पिकाची वाढ खुंटली आहे. शेतकरी वर्गाने कांदा लागवडीसाठी एकरी सत्तर ते ऐंशी हजार रूपये खर्च केले आहे मात्र कांदा पिक हातचे जाण्याची भीती निर्माण झाल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. ढोबळी मिरची व भाजीपाला पिक घुबड्या व मावा रोगाने खराब झाले आहे.०००००००००००००००००००द्राक्षांवर डावणीचा प्रादुर्भावसध्या परिसरात द्राक्ष काढणीचा हंगाम सुरु आहे मात्र ढगाळ हवामान व दवामुळे द्राक्ष पिकावर डावणी व भूरीचे प्रमाण वाढल्याने व्यापारी वर्ग द्राक्ष खरेदीकडे पाठ फिरवत असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. संपूर्ण आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडयात झालेल्या अवकाळी पावसाने संपूर्ण खरीप हंगामा वाया जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या पावसाच्या तडाख्यातून वाचलेल्या द्राक्षबागा जतन करण्यासाठी शेतकऱ्यांनी एकरी अडीच ते तीन लाख रु पये खर्च केला आहे मात्र बदलत्या हवामानामुळे संपूर्ण द्राक्ष हंगाम धोक्यात आला आहे.खर्चापेक्षा काही पटीने उत्पन्न कमी निघाल्याने शेतकरी वर्ग कर्जबाजारी झाला असून तो आर्थिक अडचणीत सापडला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक