शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक बेटांची हरवली शोभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 00:45 IST

चौकाचौकांतील सौंदर्य फुलावे यासाठी खासगी उद्योजक आणि व्यावसायिकांच्या मदतीने महापालिकेने वाहतूक बेटे साकारली खरी; परंतु नंतर संबंधित प्रायोजकांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि पालिकेनेही. परिणामी वाहतूक बेटांचे सौंदर्य हरपले असून, अनेक ठिकाणी तर वाहतूक बेटांचे भग्नावशेष शिल्लक आहेत.

नाशिक : चौकाचौकांतील सौंदर्य फुलावे यासाठी खासगी उद्योजक आणि व्यावसायिकांच्या मदतीने महापालिकेने वाहतूक बेटे साकारली खरी; परंतु नंतर संबंधित प्रायोजकांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि पालिकेनेही. परिणामी वाहतूक बेटांचे सौंदर्य हरपले असून, अनेक ठिकाणी तर वाहतूक बेटांचे भग्नावशेष शिल्लक आहेत.  शहराचे सुशोभिकरण म्हटले की वाहतूक बेटे असे पालिकेचे समीकरण ठरलेले असून, अनेक संस्थांना त्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले जाते. संबंधित चौकांच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळत असल्याने प्रचार आणि प्रसाराच्या उद्देशाने अनेक व्यावसा-यिक संस्था आकर्षक वाहतूक बेटे साकारून देतात. परंतु ही बेटे साकारल्यानंतर देखभाल आणि दुरुस्तीकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याने कालांतराने वाहतूक बेटांची अवस्था बिकट होत जाते. अनेक ठिकाणी तर रंग उडालेला आणि शिल्प मोडकळीस आलेले अशी अवस्था असते. त्यामुळे चौकाचे सुशोभिकरण दूरच, उलट विद्रुपीकरण होताना दिसते. अनेक वाहतूक बेटांमध्ये हिरवळ लावली जाते किंवा झाडेही लावली जातात; परंतु उन्हाळ्यात पाणी न मिळाल्यास हिरवळ खराब होते. सध्या अशीच स्थिती जाणवत आहे. प्रायोजकांकडून हिरवळ जगविण्याचे कोणतेही प्रयत्न होत नाहीत. काही ठिकाणी कारंजे किंवा धबधबे बंद पडले असून, ते सुधारण्याचेदेखील प्रयत्न होत नाही. महापालिकेच्या वतीने अनेकदा करार करणाºया संस्थांनी देखभाल दुरुस्ती न केल्यास नोटीस देण्याची भाषा केली जाते; परंतु प्रत्यक्षात अशा वाहतूक बेटांमध्ये कोणतीही सुधारणा केली जात नाही. परिणामी अनेक वाहतूक बेटांची वर्षानुवर्षे दुरवस्था कायम आहे.म्हणे वीज मोफत द्या...महापालिकेत मनसेची सत्ता असताना महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांनी प्रायोजकांची बैठक बोलावली होती. त्यात देखभाल दुरुस्तीसाठी वाहतूक बेटांची जबाबदारी घेण्याबाबत चर्चा होत असताना अनेक प्रायोजक व्यावसायिकांनी वाहतूक बेटासाठी महापालिकेच्या पथदीपावरून मोफत वीज तसेच कारंजा आणि तत्सम उपक्रमांसाठी मोफत पाण्याची मागणी केली. त्यामुळे अशा प्रकारच्या अपेक्षेने वाहतूक बेट फुलविणाºयांचे शहराप्रती दायित्व किती, असाही प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका