शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी बकरी ईदसाठी कडक पोलीस बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 00:25 IST

बकरी ईद सणासाठी पोलीस यंत्रणा सतर्क असून, कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. शहरातील प्रमुख ११ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. कवायत मैदानावर बॉम्बशोधक पथकाकडून दररोज तपासणी केली जात आहे.

मालेगाव : बकरी ईद सणासाठी पोलीस यंत्रणा सतर्क असून, कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. शहरातील प्रमुख ११ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. कवायत मैदानावर बॉम्बशोधक पथकाकडून दररोज तपासणी केली जात आहे. शहराबाहेर १३ ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जात आहे. ५० जणांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. पोलीस नियंत्रण कक्ष आवारात बकरी ईद सण काळात विशेष कक्ष उभारला जाणार असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दिली.  पोलिसांची सामान्य नागरिकांसोबत वर्तणूक चांगली असेल तर कायदा हातात घेणाºयांवर कठोर कारवाई केली जाईल हेच माझ्या कामाचे सूत्र आहे. निर्भिड व निपक्ष कारवाईला प्राथमिकता दिली जाईल. ईद काळात कायदा हातात घेणाºयांवर कठोर कारवाई केली जाईल. बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर महसूल, मनपा, वीज वितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी विभागांची बैठक घेऊन तयारीचा आढावा घेण्यात आला आहे. सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात अकरा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. गेल्या चार दिवसांपासून पोलीस कवायत मैदानाची बॉम्बशोधक पथकाकडून तपासणी केली जात आहे. पोलीस नियंत्रण कक्ष आवारात विशेष कक्ष सुरू केला जाणार आहे. या कक्षात महसूल, पोलीस, पशुसंवर्धन विभाग, अग्निशमन व इतर विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.  नागरिकांनी कुर्बानीसाठी एक कायमस्वरूपी व चौदा तात्पुरत्या कत्तलखान्यांचा वापर करावा. उघड्यावर कुर्बानी देणाºयांवर कारवाई केली जाईल. बकरी ईद सणकाळात २१ ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जाणार आहे. गेल्या पाच वर्षात गुन्हे दाखल असलेल्यांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. गोरक्षकांनी कायदा हातात घेऊ नये, अवैध धंद्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे संकेतही निलोत्पल यांनी दिले.  बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात येणार आहे. बाहेरगावाहून पोलिसांची अधिकची कुमक मागविण्यात येणार आहे. यात तीन पोलीस उपअधीक्षक, १४ पोलीस निरीक्षक,  ३० दुय्यम अधिकारी, ३५० पोलीस कर्मचारी, ५० महिला कर्मचारी, दोन दंगा नियंत्रण पथक, राज्य राखीव दलाची तुकडी, ३३० गृहरक्षक दलाचे जवान, ४० गृहरक्षक दलाच्या महिलांचा समावेश राहणार आहे. शहरातील नागरिकांनी शांततेत बकरी ईद सण साजरा करावा, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी केले आहे.

टॅग्स :Policeपोलिस