शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
5
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
6
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
7
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
8
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
9
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
10
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
11
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
12
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
13
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
14
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
15
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
16
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
17
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
18
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
19
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
20
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा

हरणबारी, केळझरमधून रब्बीसाठी दोन आवर्तने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 00:20 IST

सटाणा : बागलाण तालुक्यातील हरणबारी व केळझर धरणातून यंदा रब्बीसाठी दोन आवर्तने सोडण्याबाबत तसेच पिण्यासाठी अनुक्र मे ३९० व ...

ठळक मुद्देबागलाण : समितीच्या बैठकीत पाणी आरक्षित करण्याचा निर्णय

सटाणा : बागलाण तालुक्यातील हरणबारी व केळझर धरणातून यंदा रब्बीसाठी दोन आवर्तने सोडण्याबाबत तसेच पिण्यासाठी अनुक्र मे ३९० व १०१ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्याचा निर्णय कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.येथील जलसंपदा विभागाच्या कार्यालयात बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि.२४) कालवा समितीची बैठक पार पडली. बैठकीस मालेगाव येथील जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेश चौधरी, उपअभियंता ई.बी. शेवाळे, उपअभियंता अभिजित रौंदळ, शाखा अभियंता आर.बी. सूर्यवंशी, संजय पाटील उपस्थित होते. समितीच्या बैठकीत यंदाच्या रब्बी हंगामाचा प्राथमिक सिंचन आराखडा तयार करण्यात आला. तालुक्यातील हरणबारी मध्यम प्रकल्पातून सुमारे दोन हजार १५ हेक्टर या रब्बी क्षेत्राला पाणी दिले जाते, तर केळझर मध्यम प्रकल्पातून १ हजार १८० हेक्टर रब्बी क्षेत्राला पाणी दिले जाते. यंदा रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांनी तीन आवर्तनांची मागणी केली होती. मात्र पिण्याच्या पाण्याच्या आरक्षणात वाढ झाल्याने रब्बीसाठी दोनच आवर्तनाचे नियोजन करण्यात आल्याचे यावेळी कार्यकारी अभियंता चौधरी यांनी स्पष्ट केले.शेतकऱ्यांच्या मागणीनुसार हरणबारी धरणातून रब्बीसाठी पहिले आवर्तन सोडण्यात आले असून, २५० दशलक्ष घनफूट पाणी देण्यात येणार आहे. उर्वरित पाण्याचे दुसरे आवर्तन २५ फेब्रुवारीला सोडण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला, तर केळझर धरणातून येत्या १० फेब्रुवारीला े आवर्तन सोडण्यात येणार आहे. यासाठी १५४ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार आहे.दरम्यान, आमदार दिलीप बोरसे यांनी रब्बीचे पाणी शेतकºयांच्या शेतापर्यंत कसे पोहोचेल यासाठी आवश्यक ठिकाणी कालव्यांची दुरु स्ती करावी. तसेच रब्बी पिकांसाठी ठरल्याप्रमाणे दिले जाणारे दोन्ही आवर्तने शेवटच्या शेतकºयापर्यंत कसे पोहोचेल यासाठी नियोजन करावे. जेणेकरून पीक हातात येईल, अशा सूचना यावेळी संबधित अधिकाºयांना देण्यात आल्या. बैठकीस केदाबापू काकुळते, बाळासाहेब भदाणे, पांडुरंग सोनवणे, माधवराव सोनवणे, जनार्दन सोनवणे, भास्कर सोनवणे आदी शेतकरी उपस्थित होते...असा आहे रब्बीचा सिंचन आराखडा...हरणबारी धरण पाणीसाठा ११६६ दशलक्ष घनफूट पैकी बाष्पीभवन तूट ११७ दशलक्ष घनफूट, पिण्याच्या पाण्याचे आरक्षण ३९० दशलक्ष घनफूट, रब्बी हंगामासाठी ६५९ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्यात आले आहे. केळझर धरणात ५७२ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. पैकी बाष्पीभवन तूट ८६ दशलक्ष घनफूट, पिण्यासाठी १०१ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित केले आहे. ३८५ दशलक्ष घनफूट पाणी रब्बीसाठी आरक्षित करण्यात आले आहे.

टॅग्स :DamधरणWaterपाणी