पंचवटी : ओम नम: शिवाय, हर हर महादेव असा जयघोष करीत शेकडो शिवभक्तांनी श्री कपालेश्वर महादेव मंदिरात पहिल्या श्रावण सोमवारचे औचित्य साधून दर्शनाचा लाभ घेतला. भाविकांनी भल्या पहाटेपासूनच मंदिरात दर्शनासाठी तसेच विविध धार्मिक विधी करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. सोमवारी सकाळी मंदिरातील गुरवांच्या उपस्थितीत कपालेश्वर महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करण्यात आला. सायंकाळी कपालेश्वर मंदिर येथून महादेवाच्या पंचमुखी मुखवट्याची सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली.
‘हर हर महादेव’चा सर्वत्र जयघोष
By admin | Updated: August 9, 2016 01:08 IST