शहरं
Join us  
Trending Stories
1
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
2
तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
3
दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे सरकारचे आदेश; कुणाला मिळणार १० हजार?
4
बारामतीतील मुलीवर अंबाजोगाईमध्ये सामूहिक बलात्कार, बदामबाईने आधी कला केंद्रावर नेलं, नंतर लॉजवर...
5
संतापजनक...! IAS अधिकाऱ्याची गाडी तपासली; गोव्याच्या एसपींनी पोलिसांनाच दिली उठाबशांची शिक्षा...
6
निवृत्तीनंतर हातात येणार रग्गड पैसा! NPS चे नवीन नियम लागू; ५ वर्षांचा 'लॉक-इन' कालावधी संपला
7
माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद जाणार? आज अजित पवार यांची भेट घेणार, मोठ्या निर्णयाची शक्यता
8
शिंदेसेना ही अमित शाहांची 'टेस्ट ट्यूब बेबी', त्यांचा नैसर्गिक जन्म नाही; राऊतांची बोचरी टीका
9
Video - बापमाणूस! ६० फूट खोल बोरवेलमध्ये पडलेल्या लेकीसाठी वडिलांनी लावली जिवाची बाजी
10
विमा क्षेत्रात आता १००% परकीय गुंतवणुकीला मंजुरी; सर्वसामान्यांना स्वस्त पॉलिसी आणि चांगले पर्याय मिळणार?
11
'इस्लामिक दहशतवादाविरोधात उभे राहण्याची गरज', व्हाइट हाऊसमधून ट्रम्प यांचं आवाहन; केली मोठी घोषणा
12
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
13
१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा
14
टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...
15
Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
16
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
17
उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक
18
सरकार आणखी एका बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत; खात्यात येणार २१०० कोटी, सध्या आहे ९५% हिस्सा
19
'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
20
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
Daily Top 2Weekly Top 5

Happy Children's Day : भावी महापत्रकारांनी नागरी प्रश्नांची सरबत्ती करत नाशिकच्या महापौर रंजना भानसी यांना धरले धारेवर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2017 09:38 IST

नाशिक शहरातील विविध समस्या मांडत, त्यासंबंधीच्या विविध प्रश्नांची सरबत्ती करत महाराष्ट्राच्या भावी महापत्रकारांनी नाशिकच्या महापौर रंजना भानसी व सभागृहनेता दिनकर पाटील यांना धारेवर धरले.

नाशिक : डेंग्यू, मलेरियाची लागण रोखण्यासाठी काय योजना? गरीब विद्यार्थ्यांसाठी कोणत्या योजना राबवाल? प्रदूषण नियंत्रणासाठी मनपा काय उपाययोजना करणार? दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी काय कराल? अशा विविध प्रश्नांची सरबत्ती करत महाराष्ट्राच्या भावी महापत्रकारांनी नाशिकच्या महापौर रंजना भानसी व सभागृहनेता दिनकर पाटील यांना धारेवर धरले. निमित्त होते, बालदिनाच्या पूर्वसंध्येला ‘लोकमत’ने उपलब्ध करुन दिलेली पत्रकारिता करण्याची, अनुभवण्याची संधी ! या उपक्रमांतर्गत नाशकातील विविध मराठी, इंग्रजी माध्यमाच्या खासगी व महापालिका शाळांच्या निवडक विद्यार्थ्यांनी पत्रकारितेचा अनुभव लोकमतच्या नाशिक येथील अंबड औद्योगिक वसाहतीमधील मुख्य कार्यालयात घेतला. दुपारी एक ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनी भावी महापत्रकारांची भूमिका बजावली.

यावेळी त्यांनी महापौर रंजना भानसी, सभागृहनेता दिनकर पाटील यांची मुलाखत घेत विविध सामाजिक समस्यांशी निगडित प्रश्नांचा वर्षाव केला. भावी पिढीच्या मनात गोंधळ घालणा-या शहराच्या आत्मियतेविषयीचे प्रश्न ऐकून भानसी व पाटील अवाक् झाले. एकापेक्षा एक सरस अशा भन्नाट कल्पनेची जाणी करून देणारे प्रश्न यावेळी भावी महापत्रकारांनी विचारून त्यांच्या मनातील शंकांचे निरसन करुन घेतले. यावेळी घंटागाडीवर सकाळी वाजविल्या जाणा-या ध्वनिफितीचा मर्यादेपेक्षा अधिक आवाज प्रबोधनाऐवजी प्रदूषणाला निमंत्रण देणारा ठरत असल्याचेही त्यांनी भानसी यांच्या लक्षात आणून दिले. गोदावरी प्रदूषणमुक्तीच्या आणि गोदा विकासाच्या मारल्या जाणा-या गप्पा प्रत्यक्षात का अंमलात आणल्या जात नाही, असा रोख-ठोक सवालही ‘लोकमत’च्या व्यासपिठावरून या भावी महापत्रकारांनी उपस्थित केला. शहरातील महापालिकेची सुस्तावलेली आरोग्यसेवा आणि मृतशय्येवर पोहचलेले मनपाचे दवाखाने कधी सुधारणार असा थेट प्रश्नही त्यांनी विचारला. विशेष म्हणजे, महापौर रंजना भानसी यांनीही या बाल सुलभ शंकांचे निरसन करीत अतिशय खेळकरपणे त्यांची उत्तरे दिली.भावी पिढीपुढे विकासाच्या गप्पा मारून आता यापुढे चालणार नाही , तर प्रत्यक्षात त्यांना ‘विकास’ हवा आहे, व त्याची त्यांना जाणही आली आहे, याची खात्री यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींना पटली.

नाशिकच्या भावी महापत्रकारांचा ‘लोकमत’मध्ये  एक दिवस दप्तराचं वाढतं ओझं या समस्येवर व्यक्त केली चिंता. शेतकरी व शेतीमालाला मिळणा-या हमीभावाविषयी व्यक्त केली नाराजी. सरकारने आश्वासने न देता प्रत्यक्षात योजना प्रभावीपणे राबविण्याची केली मागणी. नोटाबंदीमुळे सर्वसामान्यांचे झालेले हाल यावरही टाकला बाल पत्रकारांनी लेखणीतून प्रकाश. गोदा प्रदूषणाविषयीचा मुद्दाही पोटतिडकीने मांडत महापौरांना बोलते केले. या विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग नेहा कोठावदे (सारडा कन्या विद्यालय)श्वेता मोघे (आदर्श माध्यमिक विद्यालय)निशा भदाणे, अमिषा डावरे ( रचना विद्यालय)पुर्वा चौधरी (सरस्वती विद्यालय)गायत्री वाणी (डे केअर सेंटर)श्रुती पाटील (न्यू इरा स्कूल)आयुष कटारिया, अर्जित कोरडे (अशोका ग्लोबल अ‍ॅकडमी)प्रतीक्षा काकड (छत्रपती शिवाजी विद्यालय मखमलाबाद)मुग्धा थोरात (न्यू मराठा हायस्कूल )मंजिरी पाटील, मृणालिनी देशमुख (मराठा हायस्कूल)हेतवी रुपरेल (इस्पॅलियर एक्सपिरिमेंटल स्कूल)वैदेही शिरास, (सीडीओ मेरी हायस्कूल)सानिया अन्सारी (गुरूगोविंद पब्लिक स्कूल)

 

टॅग्स :children's dayबालदिनNashikनाशिक