शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'शरद पवार राष्ट्रपती झाल्यास आनंदच, ती महाराष्ट्रासाठी गर्वाची बाब'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 12:00 IST

येवला येथे सहकारी सोसायटीचे नवनिर्वाचित संचालक यांच्या सत्कार कार्यक्रम प्रसंगी आले असता पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी मनातील गोष्ट बोलून दाखवली.

मुंबई - देशात आता राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. काँग्रेसकडूनही आपला उमेदवार देण्यासाठी धावाधाव आणि गाठीभेटी होत आहेत. त्यातच, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना राष्ट्रपतीपदासाठी आपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यानंतर, आता छगन भुजबळ यांनीही शरद पवार राष्ट्रपती झाल्यास आनंदाची गोष्ट असून महाराष्ट्राकरिता गर्वाची बाब राहील, असे म्हटले आहे. 

येवला येथे सहकारी सोसायटीचे नवनिर्वाचित संचालक यांच्या सत्कार कार्यक्रम प्रसंगी आले असता पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी मनातील गोष्ट बोलून दाखवली. उद्धव ठाकरे यांना ममता बॅनर्जीं राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात आमंत्रण दिले असून यावेळी राष्ट्रपती पदासाठी उमेदवार म्हणून शरद पवार यांचे नाव सुचविले जाणार आहे. यासंदर्भातच भुजबळ यांना प्रश्न विचारण्यात आला होता. 

यासंदर्भात बोलताना भुजबळ म्हणाले की, ममता बॅनर्जींनी विरोधी पक्षाचे सर्वच मुख्यमंत्री, तसेच विरोधी पार्टीचे प्रमुख नेत्यांना आमंत्रित केलं आहे. या सर्व नेतेमंडळींसोबत बैठक घेऊन राष्ट्रपती पदासाठी कोणाला उभे केले जावे, याची चाचपणी बॅनर्जी करत आहेत. याबाबत सर्वच विरोधीपक्ष नेत्यांशी विचार विनिमय करत शरद पवार यांचे नाव पुढे आले आहे. यासंदर्भात शरद पवार यांनी हो म्हटले की नाही, हे मला माहित नाही, असे भुजबळ यांनी सांगितले. दरम्यान, महाराष्ट्रातून शरद पवार हे एवढ्या मोठ्या पदावर गेल्यास नक्कीच आनंदाची व गर्वाची गोष्ट महाराष्ट्र करता राहील, असेही पुढे त्यांनी म्हटले. 

'शरद पवारांना काँग्रेसचा पाठिंबा'

राष्ट्रपती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि देशातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावची चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी शरद पवारांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शवला आहे. 'शरद पवारांना जर राष्ट्रपती पदाचा उमेदवार घोषित केले, तर काँग्रेसचा त्यांना पाठिंबा असेल', असे वक्तव्य नाना पटोले यांनी केले आहे. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसPresidentराष्ट्राध्यक्षChagan Bhujbalछगन भुजबळ