शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

परराज्यातून परतणाऱ्या मजूरांच्या मदतीसाठी सरसावले हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 15:41 IST

देशात लॉकडाऊनमुळे परराज्यातील मजूर गावाकडे परतू लागले आहेत. प्रवासी वाहतूक सेवा बंद असल्याने हे मजूर पायपीट करीत रवाना होत आहेत. महाराष्ट्र व गुजरात सीमेलगत जिरवाडे चेकपोस्टवर अभोणा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड व त्यांचे सहकारी खासगी वाहन, प्रवाशांच्या चौकशीबरोबर पायपीट करणाºया मजुरांना अन्न पाण्याच्या मदतीचा हात देत आहेत. जिल्ह्यात व तालुक्याच्या विविध भागात मजुरांना व स्थानिक गरजू कुटुंबांना जेवणासह जीवनावश्यक वस्तू देण्यासाठी मदतीचे हात पुढे सरसावले आहेत.

ठळक मुद्देपोलिसांची तत्परता :पायपीट करणाऱ्यांच्या अन्नपाण्याची सोय

कळवण : देशात लॉकडाऊनमुळे परराज्यातील मजूर गावाकडे परतू लागले आहेत. प्रवासी वाहतूक सेवा बंद असल्याने हे मजूर पायपीट करीत रवाना होत आहेत. महाराष्ट्र व गुजरात सीमेलगत जिरवाडे चेकपोस्टवर अभोणा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड व त्यांचे सहकारी खासगी वाहन, प्रवाशांच्या चौकशीबरोबर पायपीट करणा-या मजुरांना अन्न पाण्याच्या मदतीचा हात देत आहेत. जिल्ह्यात व तालुक्याच्या विविध भागात मजुरांना व स्थानिक गरजू कुटुंबांना जेवणासह जीवनावश्यक वस्तू देण्यासाठी मदतीचे हात पुढे सरसावले आहेत.गुजरात राज्यातून महाराष्ट्रात येणा-यांसाठी जिरवाडे येथे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार चेकपोस्ट उभारण्यात आले आहे. गुजरात राज्यातून हातगड व वीरशेत मार्गे बहुतांशी मजूर आपल्या घराकडे पायपीट करीत निघाले आहेत. त्यात काही सुरगाणा भागातील तर काही कळवण तालुक्यातील आहेत. कोरोना विषाणूच्या संक्र मणाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने सर्वत्र संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदीत गावाकडे पायी निघालेल्या शेतमजुरांचा रोजच्या कमाईवर उदरनिर्वाह चालतो. हाताला काम मिळाले तरच पोटाला भाकरी मिळते. मात्र लॉकडाऊनमुळे जीवनावश्यक वस्तुविना बेहाल झालेले मजूर शेकडो किमी पायी प्रवास करीत घराकडे निघाल्याने त्यांना विश्रांतीचा सल्ला तसेच चहा, पाणी,जेवण, बिस्कीट, सॅनिटायझरसह आवश्यक ती मदत जिरवाडे चेकपोस्टवर केली जात आहे.

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिस