शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

मदतीचे हात सरसावले पुढे...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 00:19 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध मार्गांनी योगदान देणाऱ्यांचे हात पुढे येत आहेत. नाशिकमधील जैन समाजातील विविध संस्थांनी विविध ठिकाणच्या मिळून तब्बल २७४ खोल्या प्रशासनाला उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे आवश्यकता भासल्यास या खोल्या प्रशासनाला संशयितांना क्वारंटाइन करण्यासाठी वापरता येणार आहेत.

ठळक मुद्देस्वयंप्रेरणा : जैन समाजाने क्वारंटाइन व्यक्तींसाठी प्रशासनाला दिल्या २७४ खोल्या

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध मार्गांनी योगदान देणाऱ्यांचे हात पुढे येत आहेत. नाशिकमधील जैन समाजातील विविध संस्थांनी विविध ठिकाणच्या मिळून तब्बल २७४ खोल्या प्रशासनाला उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे आवश्यकता भासल्यास या खोल्या प्रशासनाला संशयितांना क्वारंटाइन करण्यासाठी वापरता येणार आहेत.विदेशांतील स्थिती पाहता कोरोनाची व्याप्ती प्रचंड प्रमाणात वाढण्याची भीती आहे. त्यामुळे नागरिकांना पुरेशा प्रमाणात क्वारंटाइन करण्यासाठी अधिकाधिक सार्वजनिक जागांची व्यवस्था प्रशासनाला करावी लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जैन समाजाने पुढाकार घेत त्यांच्या संस्थांच्या ताब्यातील २७४ खोल्या मनपा प्रशासनाला रुग्ण क्वारंटाइन करण्यासाठी उपलब्ध होऊ शकणार आहेत.जैन समाजाच्या संस्थाप्रमुखांनी मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भात निवेदन देण्यासह उपलब्ध जागांची माहिती दिली.त्यावेळी श्री जैन ओसवाल बोर्डिंगचे प्रमुख शशिकांत पारख,विल्होळीचे धर्मचक्र प्रभाव तीर्थचे विलास शहा, म्हसरूळचे दिगंबर जैन तीर्थक्षेत्र गजपंथच्या सुवर्णा काले, चोपडा लॉन्सचे संचालक सुनील चोपडा, भारतीय जैन संघटनेचे समन्वयक नंदकुमार सांखला, जितोचे समन्वयक सतीश हिरण आणि नामको हॉस्पिटलसेवा सदनचे पदाधिकारी उपस्थित होते.नाशिक जिल्ह्यासह, राज्य आणि देशभरातील विविध भागांतून अनेक नागरिक आपला उदरनिर्वाह करण्यासाठी शहरातील विविध रस्त्यांच्या कडेला पाल ठोकून राहतात, तर काहीजण उड्डाण पूल व शहर परिसरातील वेगवेगळ्या मैदानांवर आश्रय शोधून दिवसभर काम करून आपल्या पोटाची भूक भागवतात. परंतु, गेल्या आठवडाभरापासून अशा हातावर पोट असणाºया नागरिकांचे काम बंद असल्याने त्यांना दोन वेळच्या अन्नाची भ्रांत आहे.या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अद्वैत मानवता ग्रुपच्या केतन शाह, दीपक शाह, अजय चौधरी, भावेश शाह, रोमील शाह यांनी एकत्र येऊन रोज किमान ५० गरजूंना दोन वेळचे भोजन पुरविण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्याचप्रमाणे पंचवटीतील राजू पोद्दार, फावडे लेन येथील शीतल वाघ यांच्यासह शहरातील विविध सामाजिक संस्थांनीही पुढाकार घेत रस्त्यावरील वंचितांना दोन वेळचे अन्न पुरविण्याचे काम हाती घेतले आहे.गोरगरिबांसाठी अन्नदान !कोरोनाच्या सावटावर मात करण्यासाठी प्रशासन झटत असताना त्यातील काही कठोर निर्बंधांमुळे समाजातील हातावर पोट असणारे गोरगरीब, पाल ठोकून राहणारी मजूर कुटुंबे आणि निराश्रित वृद्ध यांचाही जीव वाचवला पाहिजे, या उद्देशाने काही सामाजिक संस्था पुढे सरसावल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने राज्यात संचारबंदीची घोषणा केल्यानंतर रस्त्याच्या कडेला राहणाºया बेघरांचे, हातावर पोट असलेल्या मजूर व कामगारांचे काय होणार याविषयी? असा प्रश्न सर्वांनाच पडलेला असताना शिंगाडा तलाव परिसरातील अद्वैत मानवता ग्रुपने सामाजिक भान जपत अशा सर्व घटकांसाठी मदतीचा हात देत दोन वेळचे अन्न पुरविण्याचे काम सुरूकेले आहे.

टॅग्स :NashikनाशिकRadhakrishna Gameराधाकृष्ण गमेJain Templeजैन मंदीर