शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमधील मनपा गाळेधारकांचा निर्णय महापौरांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 15:24 IST

बैठकीची प्रतीक्षा : सत्ताधारी भाजपाच्या भूमिकेकडे लक्ष

ठळक मुद्देसमिती स्थापन झाल्यापासून अद्याप एकदाही बैठक झालेली नाहीदरवाढ रद्द करावी अथवा पूर्वलक्षी प्रभावाने ती लागू करण्यात येऊ नये, अशी मागणी गाळेधारकांनी केली आहे

नाशिक - महापालिकेच्या गाळेधारकांना रेडीरेकनरनुसार करण्यात आलेल्या भाडेवाढीबाबत महापौरांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या समितीने निर्णय घेण्याची सूचना नगरविकास राज्यमंत्र्यांनी केल्याने आता समितीच्या निर्णयाकडे लक्ष लागून असणार आहे. समिती स्थापन झाल्यापासून अद्याप एकदाही बैठक झालेली नाही. आता समितीच्या हाती निर्णय असल्याने गाळेधारकांना बैठकीची प्रतीक्षा आहे.महापालिकेने आपल्या मालकीच्या गाळ्यांमध्ये अडीच वर्षांपूर्वी रेडीरेकनरनुसार भाडेदरवाढ केली होती. सदर दरवाढ ही अन्याय्य असल्याचे सांगत गाळेधारकांच्या संघटनेने त्यास विरोध दर्शविला आहे. सदर दरवाढ रद्द करावी अथवा पूर्वलक्षी प्रभावाने ती लागू करण्यात येऊ नये, अशी मागणी गाळेधारकांनी केली आहे. त्यासाठी गेल्या दीड-दोन वर्षांपासून संघटना लढा देत आहे. दरम्यान, बुधवारी (दि.१७) मंत्रालयात आमदार सीमा हिरे यांच्या पुढाकाराने नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्याकडे गाळेधारकांसमवेत बैठक होऊन चर्चा झाली होती. या चर्चेत महापालिकेत सदर प्रश्नी महापौरांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झाल्याचे परंतु, अद्याप समितीची एकही बैठक झाली नसल्याचे समोर आले. त्यामुळे, नगरविकास राज्यमंत्र्यांनी सदरचा प्रश्न समितीच्या पातळीवरच सोडविण्याच्या सूचना महापालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिका-यांना दिल्या आहे. एका अशासकीय पत्रावर महापौरांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झालेली असून त्यात उपमहापौर, सभागृहनेता, स्थायी समिती सभापती आणि सर्व पक्षांचे गटनेते यांचा समावेश आहे तर सदस्य सचिव म्हणून नगरसचिवांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता समितीच्या हाती गाळेभाडेवाढीबाबतचा निर्णय असल्याने समितीच्या पहिल्या-वहिल्या बैठकीची प्रतीक्षा गाळेधारकांना लागून आहे....तर लिलावाची शक्यता!महापौरांच्या अध्यक्षतेखाली समितीने गाळेभाडेवाढीबाबतचा निर्णय घेऊन त्याला महासभेची मंजुरी मिळवायची आहे. महासभेकडून भाडेवाढीबाबत जो काही निर्णय होईल, त्यानुसार त्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे. मात्र, महासभेने भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि आयुक्तांनी तो विखंडनासाठी शासनाकडे पाठविला. शासनाने तो मंजूर केला तर गाळ्यांसंबंधीचा जो मूळ प्रस्ताव लिलावासंदर्भातील आहे, तो लागू होऊ शकतो. परिणामी, गाळेधारकांना पुन्हा लिलावाच्या प्रक्रियेला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

 

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका