शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

बागलाणमधील फडकीतील हस्तकलेला येणार ऊर्जितावस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 00:48 IST

लोहोणेर : बागलाण तालुक्यातील ठेंगोडा येथील ग्रामीण हस्तकलामधील पूर्वापार चालत आलेला फडकी छपाई व्यवसाय आता लोप पावत चालला आहे. ही कला पुढील काळात देखील जिवंत रहावी,यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी येथील हस्त कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्यक्ष भेट देत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

ठळक मुद्देठेंगोडा : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतली कारागिरांची भेट

फडकी छपाई व्यवसाय ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी येथील रंगारी समाजबांधवांशी समस्या जाणून घेत फडकी कशाप्रकारे तयार केली जाते, यात वापरला जाणारा कच्चा माल कुठून उपलब्ध होतो. विक्रीव्यवस्थेत येणाऱ्या अडचणी याबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य मीना मोरे, पंचायत समिती सदस्य ज्योती देवरे, गटविकास अधिकारी पी. एस. कोल्हे, सहायक गटविकास अधिकारी हेमंतकुमार काथेपुरी, विस्तार अधिकारी आर. एम. सूर्यवंशी, बालविकास प्रकल्प अधिकारी आर. एस. भामरे, एम. ए. जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी हेमंत अहिरराव उपस्थित होते.यावेळी स्वयंभू श्रीसिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेऊन ट्रस्टने केलेल्या विकासकामांची पहाणी करत भविष्यात करावयाच्या विकासकामाबाबत माहिती घेतली. गावातील हस्त व्यवसायातून कापडी फडकी तयार करणाऱ्या कुटुंबातील कारागीर व्यवसायात अनेक अडचणींचा सामना करत असून, व्यवसायात कष्ट अधिक असून, मिळणारा नफा हा खूपच कमी प्रमाणात असल्याने हा व्यवसाय नवीन पिढी करण्यास तयार होत नाही. तसेच नवनवीन डिझाईन व रंगाचे कापड बाजारात उपलब्ध होत असल्याने या मालाला असलेली मागणी खूपच कमी प्रमाणात होत आहे. हस्तकला व्यवसाय भविष्यातदेखील टिकून रहावा, यासाठी प्रोत्साहन देऊन त्यांना बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा तसेच विविध संस्थांच्या माध्यमातून हस्तकलाकारांना प्रशिक्षण, नवीन सुधारणा करून मदत करण्याचे आपले प्रयत्न असून, जिल्ह्यातील हस्तकलाकारांना एकत्र आणून अनेक चांगली उत्पादने तयार करून तसेच त्यांना चांगले उत्पन्न मिळवून देण्यासाठी काम करण्यात येईल, असे लीना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले. तसेच गणेशनगर येथील अंगणवाडी येथे भेट देऊन येथील गरोदर मातांना पोषण आहाराचे वाटप करण्यात आलेयावेळी वसंत शिंदे, प्रदीप शेवाळे, भरत धनवटे, दिलीप अहिरे, किशोर कोठावदे, हेमंत जगताप, नीलेश भावसार, आरोग्य सेवक रामचंद्र हिरे, ग्रामविकास अधिकारी संजय वाघ उपस्थित होते.फडकी ही ग्रामीण भागातील आदिवासी समाजात फडकी वस्त्राला महिलांमध्ये अतिशय मानाचे स्थान असून, आदिवासी महिला आजही परंपरागत चालीरीती जोपासत फडकीचा वापर शालसारखा अंगावर पांघरूण म्हणून करतात, लग्न समारंभावेळी कापड खरेदीवेळी पहिले शुभ वस्त्र म्हणून फडकीची पूजा करत इतर वस्त्र खरेदी केले जाते. परंतु, बस्ता पद्धत जवळपास नवीन पिढीत बंद झाल्याने फडकीची मागणी कमी झाली असल्याचे फडकी तयार करणारे कारागीर शांताराम भावसार यांनी सांगितले.फडकी बनवण्यासाठी कच्चा माल महाग झाला असून, छपाई करण्यासाठी कारागीर मजुरी कमी असल्याने नवीन पिढी तयार होत नाही. मिळणारा नफा खूपच कमी असल्याने आधुनिकतेमुळे मागणी कमी झाली.- शांताराम भावसार, फडकी हस्तकला कारागीर, ठेंगोडा

टॅग्स :Nashikनाशिकzpजिल्हा परिषद