शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

संदीप वाजेच्या मावसभावाला ठोकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2022 01:11 IST

मनपाच्या वैद्यकिय अधिकारी सुवर्णा वाजे हत्याकांडात मुख्य संशयित म्हणून पोलिसांनी अटक केलेला त्यांचा पती संदीप वाजे यास बुधवारी (दि.१६) न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, वाडीवऱ्हे पोलिसांनी संदीपचा मावसभाऊ व जवळचा मित्र बाळासाहेब उर्फ यशवंत रामचंद्र म्हस्के यास पोलिसांनी प्राप्त पुराव्यांच्याअधारे बुधवारी अटक केली.

ठळक मुद्देआज करणार न्यायालयात हजर :सुवर्णा वाजे हत्याकांडात सहभागाचा पोलिसांना संशय

नाशिक : मनपाच्या वैद्यकिय अधिकारी सुवर्णा वाजे हत्याकांडात मुख्य संशयित म्हणून पोलिसांनी अटक केलेला त्यांचा पती संदीप वाजे यास बुधवारी (दि.१६) न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, वाडीवऱ्हे पोलिसांनी संदीपचा मावसभाऊ व जवळचा मित्र बाळासाहेब उर्फ यशवंत रामचंद्र म्हस्के यास पोलिसांनी प्राप्त पुराव्यांच्याअधारे बुधवारी अटक केली.

संशयित पती संदीप वाजेची चौदा दिवसांची पोलिस कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने बुधवारी मध्यवर्ती कारागृहात वाजेची रवानगी केली. मागील बारा दिवसांपासून पोलिसांनी वाजेची कसून चौकशी करत या गुन्ह्यात अजून त्याच्यासोबत किती साथीदार होते याची माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. तसेच तांत्रिक विश्लेषणाच्याअधारे हाती आलेल्या पुराव्यांवरुन संशयितांची धरपकड करत कसून चौकशी केली. पोलिसांना वाजेच्या दोघा संशयित मित्रांवर संशय होता. यापैकी म्हस्केविरुद्ध प्राप्त पुराव्यांवरुन पोलिसांनी सुवर्णा वाजे खूनप्रकरणात सहभागी असल्याच्या संशयावरुन अटक केली. म्हस्के यास गुरुवारी (दि.१७) इगतपुरी न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले. सुवर्णा वाजे यांनी लिहिलेले पत्र आणि चॅटिंगच्या आधारे डॉ. वाजेंचा खून संशयित पती संदीप वाजे यानेच केल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलीस कोठडीत तपासाकरिता वाजे याने फारसे सहकार्य पोलिसांना केले नाही. त्याने अद्यापही गुन्ह्याची कबुली दिलेली नाही. त्यामुळे पोलिसांनी त्यास न्यायालयीन कोठडी द्यावी, अशी मागणी न्यायालयाकडे केली होती.

त्यानंतर सायंकाळी वाडीवऱ्हे पोलिसांनी दुसरा संशयित बाळासाहेब म्हस्के याला अटक केल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पवार यांनी सांगितले.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारीArrestअटक