शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

अश्लील चॅटिंग करणाऱ्यास बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 01:40 IST

व्हॉटस्ॲपच्या माध्यमातून एका महिलेसोबत अश्लील चॅटींग करणाऱ्याच्या मुसक्या आवळण्यात नाशिक पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी शंशयिताच्या मोबाईलचा माग काढत औरंगाबादच्या फुलंब्री येथे त्याला बेड्या ठोकल्या असून न्यायालयाने त्याला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

नाशिक :   व्हॉटस्ॲपच्या माध्यमातून एका महिलेसोबत अश्लील चॅटींग करणाऱ्याच्या मुसक्या आवळण्यात नाशिक पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी शंशयिताच्या मोबाईलचा माग काढत औरंगाबादच्या फुलंब्री येथे त्याला बेड्या ठोकल्या असून न्यायालयाने त्याला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. नाशिक शहरात कामाला असलेल्या पिडित महिलेला डिसेंबर २०१९ मध्ये राशी भविष्य या व्हॉटसअप ग्रुप वर कोणीतरी जोडले. त्यामध्ये त्यांनी त्यांच्या वैयक्तिक समस्या शेअर केल्या. त्यातील एका मोबाईल क्रमांकाने त्यांना प्रतिसाद दिला. त्याने त्यांचे नाव अमोल जाधव असे सांगुन तो डॉक्टर असल्याची बतावणी केली.  पिडितेला समस्या सोडविण्यासाठी औरंगाबादला येण्यास सांगीतले. मात्र त्याचे वागणे अक्षेपार्ह  वाटल्याने पिडितेने त्याला ब्लॉक केले. त्यानंतरही त्याने पिडितेला  संपर्क साधला. त्यांच्याशी  २९ फेब्रुवारी २०२० रोजी अश्लिल चॅटींग करून फिर्यादी यांना स्वत:चे अश्लिल फोटो पाठवन फुलंब्री येथून दवाखाना बंद करून पळ काढला. 

शोध घेऊनही तो मिळत नसल्याने पोलीस निरीक्षक देवराज बोरसे,पोलीस शिपाई मंगेश्वर काकुळदे, राउत यांनी आरोपीने वापरलेल्या मोबाईलच्या आधारे बुधवारी (दि.५) फुलंब्री येथे जावुन  डॉ.अमोल किसन जाधव, वय(२८, रा.वावना, तालुका फुलंब्री, औरंगाबाद) याला अटक केली. दरम्यान, न्यालायालाने जाधवची एक दिवस पोलीस कोठडीत रवानगी केली असून  त्याने आणखी काही  महीलांच्या बाबत या प्रकारचा गुन्हा केला आहे का याचा पोलीसशोध घेत आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयArrestअटकCrime Newsगुन्हेगारी