शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चोरीच्या दुचाकीवरून सोनसाखळ्या खेचणाऱ्याला बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 00:31 IST

सिन्नर : सिन्नर, निफाडसह लगतच्या शिर्डी येथे दुचाकी चोरून त्याद्वारे महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणाऱ्या एका संशयितास सिन्नर पोलिसांनी अटक ...

ठळक मुद्देसिन्नर पोलिसांची कामगिरी : एक ताब्यात, आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता

सिन्नर : सिन्नर, निफाडसह लगतच्या शिर्डी येथे दुचाकी चोरून त्याद्वारे महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणाऱ्या एका संशयितास सिन्नर पोलिसांनी अटक केली आहे. त्याने सहा दुचाकी चोरीच्या प्रकारासह चार ठिकाणी सोनसाखळ्या चोरल्याच्या गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती जिल्हा पोलीसप्रमुख सचिन पाटील यांनी दिली. या संशयिताकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.गेल्या अनेक महिन्यांपासून सिन्नर शहर व तालुका परिसरात मोटारसायकल चोऱ्यांचे व सोनसाखळी चोरीचे प्रमाण वाढलेले होते. दि. १० जुलै रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास आडवा फाटा सिन्नर येथून एक होंडा शाईन मोटारसायकल ही चोरट्याने चोरून नेल्याने सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरचे मोटारसायकलवरून निफाड शहरातून एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत बळजबरीने ओढून चोरून नेल्याचा प्रकार घडलेला होता. त्यावरून निफाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर घटनेची नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी तात्काळ दखल घेऊन गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी नाशिक शहर व जिल्ह्यात तसेच नजीकच्या जिल्ह्यात तपास पथके रवाना केली होती. सिन्नर पोलीस ठाण्याकडील पोलीस पथकाने आरोपींच्या गुन्हा करण्याच्या पद्धतीवरून व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदर गुन्ह्यात संशयित आरोपीतांची नावे निष्पन्न केली. यातील संशयित हा बुधवारी (दि.१४) रात्रीच्या सुमारास सिन्नर आडवा फाटा येथे येणार असल्याबाबत गुप्तबातमीदारामार्फत बातमी मिळाल्याने पोलीस पथकाने सापळा रचून त्यास रात्री उशिरा ताब्यात घेतले. त्याचेकडे चौकशी केली असता सिन्नर येथून मोटारसायकल चोरी करून त्याने त्याचे दुसरे साथीदाराचे मदतीने निफाड शहरात सोनसाखळी चोरी केली असल्याबाबत कबुली दिल्याने त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकलही हस्तगत करण्यात आली आहे. पत्रकार परिषदेस निफाडचे पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे, सिन्नरचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे उपस्थित होते.मोटारसायकलींचा वापर चोरीसाठीचचौकशीत त्याने व त्याच्या साथीदाराने सिन्नर शहरातील आडवा फाटा व बसस्थानक परिसरातून मोटारसायकली चोरी करून त्यांचा वापर करून सिन्नर, निफाड, शिर्डी, संगमनेर या शहरात सोनसाखळीचे गुन्हे केले व त्या मोटारसायकली शिर्डी बसस्थानक परिसरात बेवारस स्थितीत सोडून दिल्याची कबुली दिलेली आहे. या संशयित आरोपीस अटक करण्यात आली असून, त्याचा दुसऱ्या फरार साथीदाराचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली...यांनी रचला सापळादुचाकी आणि सोनसाखळी चोराचा छडा लावण्यासाठी सिन्नर पोलिसांच्या पथकाने कंबर कसली होती. पोलीस अधीक्षक सचिन पाटील, उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नर ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, सपोनि विजय माळी, सहा.पोलीस उपनिरीक्षक गणेश परदेशी, हवालदार भगवान शिंदे, विनायक आहेर, विनोद टिळे, समाधान बोराडे, आप्पासाहेब काकड, कृष्णा कोकाटे यांच्या पथकाने मोटारसायकल व सोनसाखळी चोऱ्या करणाऱ्या संशयितास सापळा रचून अटक केली. यातून अनेक गुन्हे उघडकीस येत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPolice Stationपोलीस ठाणे