खर्च येणार आहे. म्हणजेच पाच वर्षासाठी २१ कोटी ८ लाख रुपये इतका खर्च होणार असून यंत्रसामुग्रीच्या दुप्पट खर्च असतानाही हा प्रस्ताव ज्यादा विषयात मांडून मंजूर करण्यात आला.
इन्फो...
विरोधकांचा लटका विरोध
महासभेत या विषयाला विरोधकांकडून फार कडाडून विरोध झाला नाही. राष्ट्रवादीचे गजानन शेलार यांनी यांत्रिक झाडूवरील खर्चाऐवजी प्रत्येक नगरसेवकाच्या शिफारसीने प्रत्येकी पाच कामगार घ्यावा अशी मागणी त्यांनी केली. शहरातील सर्व रस्ते उखडले गेले असताना यांत्रिकी पद्धतीने सफाई अशक्य असल्याचे अजय बोरस्ते यांनी सांगितले तर मनसे गटनेता सलीम शेख यंत्रसामग्री पेक्षा अधिक पैसे देखभाल दुरुस्तीवर दाखवलेला खर्च प्रस्ताव संशयास्पद आहे. काँग्रेस गटनेता शाहू खैरे, शिवसेना गटनेता विलास शिंदे आणि रिपाइंच्या दीक्षा लोंढे यांनी बेरोजगारी वाढण्याची भीती व्यक्त करून या यांत्रिक झाडू खरेदीला विरोध केला. सभागृह नेते कमलेश बोडके यांनी समर्थन केले तर यांत्रिकी विभागाचे अधीक्षक अभियंता उदय धर्माधिकारी यांनी प्रशासनाच्या प्रस्तावाची माहिती दिली.
इन्फो..
कोरोना महापालिकेच्या उत्पन्नात सुमारे ३०० कोटी रुपयांची घट नगरसेविकांच्या कामांना कात्री लावली जात असताना दुसरीकडे मात्र
सत्तारूढ भाजपाचा होऊ द्या खर्च सुरू आहे. वर्षभरापूर्वीच आऊटसोर्सिंगने सातशे कामगार भरण्यात आले होते आणि त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च मोजण्यात आला आहे.त्यात आता या प्रस्तावाची भर पडली आहे.