शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

बंदिस्त नाल्यांच्या नावाखाली ‘हात की सफाई’ मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 00:48 IST

पावसाळापूर्व नाल्याची सफाई हा महापालिकेचा महत्त्वाकांक्षी उपक्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही राबविण्यात येत असला तरी बहुतांशी नाले बंदिस्त आहेत. विकासकांनी नाले बंदिस्त केले किंवा सपाटच केल्यानंतरही प्रशासनाच्या वतीने सफाईचे काम केले जात असल्याचे सांगितले जात असेल तर नाले सफाईपेक्षा हात की सफाईच ठरावी.

नाशिक : पावसाळापूर्व नाल्याची सफाई हा महापालिकेचा महत्त्वाकांक्षी उपक्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही राबविण्यात येत असला तरी बहुतांशी नाले बंदिस्त आहेत. विकासकांनी नाले बंदिस्त केले किंवा सपाटच केल्यानंतरही प्रशासनाच्या वतीने सफाईचे काम केले जात असल्याचे सांगितले जात असेल तर नाले सफाईपेक्षा हात की सफाईच ठरावी. प्रशासनाने आता कितीही दावे केले तरी नाले खरोखरीच स्वच्छ केले होते काय यांची परीक्षा मात्र मुसळधार पावसानंतरच होणार आहे.मुंबई महापालिके प्रमाणेच नाशिक महापालिकेचा नालेसफाई हा वार्षिक कार्यक्रम असतो आणि तो तितकाच संशयास्पद असतो. पावसाळ्याच्या तोंडावर महापालिका पूर्वतयारी म्हणून जी काही कामे करते त्यात कितपत तथ्य असते हे मात्र पावसाळ्यातच कळते. पश्चिम विभागाचे दोन भाग पडतात. त्यातील काही भाग गावठाणाला जोडलेला आहे. तर उर्वरित भाग कॉलेजरोड, गंगापूररोडसारखा उच्चभ्रू वसाहतींचा आहे.गोदावरीला थेट मिसळणारा सरस्वती नाला आता बंदिस्त झाला आहे. तथापि, शहरातील पावसाळी गटार आणि भुयारी गटार या दोन्ही योजनेत पावसाचे वेगाने वाहणारे पाणी कहर करते. गावठाण भागात आणि तेही उतारावर असलेल्या सखल भागात पाणी साचते. त्यामुळे सराफ बाजार, कापड बाजार, भांडी बाजार यांसारखा मोठा भाग प्रभावित होतो. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचते आणि नंतर ते दोन दोन दिवस झिरपत नाही. यंदा महापालिकेने नाले सफाई केल्याचा दावा केला असला तरी या मूळ गावठाणाकडे लक्ष पुरवलेले नाही. सराफ बाजारातील नाले साफच झाले नसल्याची तक्रार या भागातील विक्रेते-व्यावसायिक करीत आहेत.पश्चिम भागात चोपडा नाला आता बंदिस्त झाला आहे. विसे मळा, विद्या विकास सर्कल जवळील नाला असे अनेक नाले विकासाच्या नावाखाली जमिनीखाली गेले आहेत किंवा काही ठिकाणी विकासकांनी ते गायबच केले आहेत. महापालिकेचे राजीव गांधी भवन हेदेखील नाल्यावरच उभे आहे. तथापि, हे नाले कितपत साफ होतात ही शंका आहे.कॅरीबॅगमुळे तुंबतात नालेपावसाळ्यात हे नाले तुडुंब भरून रस्त्यावर पाणी साचते, तेव्हा नाल्यांच्या सफाईचे पितळ उघडे पडते. महापालिकेच्या राजीव गांधी भवनासमोर किंवा सरकारवाडा पोलीस ठाणे, गंगापूररोड विद्या विकास सर्कल, कॉलेजरोडवर आसावरी चेंबर ही नेहमीच्या पाणी साचणाऱ्याची ठिकाणे असून बहुतांशी ठिकाणी चेंबरमधून पाणी उफाळून बाहेर येत असते. महापालिकेने नाल्याची स्वच्छता केली असेल आणि प्रवाही केले असेल तर पाणी साचायलाच नको, मात्र असे घडलेच तर मग पावसाचा वेग खूप होता, मर्यादेपेक्षा अधिक पाऊस कमी वेळात झाला किंवा नागरिकांनी फेकलेल्या कॅरिबॅगमुळे नाले तुंबले अशाप्रकारचा दावा केला जातो.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिकRainपाऊस