नाशिक : महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने नाशिक पूर्व विभागात मोहीम राबवत तीन अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालविला. निवडणुकीनंतर महापालिकेने पुन्हा एकदा अतिक्रमण विरोधी मोहीम सुरू केली आहे.महापालिकेच्या पथकाने गुरुवारी (दि.२३) नाशिक पूर्व विभागातील अनधिकृत बांधकामांकडे आपला मोर्चा वळविला. नेहरू चौकातील संजय देव यांनी पार्किंगच्या जागेत अनधिकृतपणे गाळ्याचे बांधकाम केले होते. महापालिकेकडे प्राप्त तक्रारीवरून पथकाने सदर गाळ्याच्या बांधकामांवर हातोडा चालविला. त्यानंतर पथकाने काठे गल्लीतील बनकर मळा येथील राजेश धनवारे यांनी अनधिकृतपणे उभारलेले शेड हटविले, तसेच महेंद्र पटेल यांच्याही अनधिकृत शेडचे बांधकाम उद्ध्वस्त करण्यात आले. नाशिक पूर्वच्या विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे, अधीक्षक एम. डी. पगारे, सहायक अधीक्षक शिवाजी काळे यांच्या उपस्थितीत दोन पथकांनी सदर कारवाई पार पाडली. (प्रतिनिधी)
अनधिकृत बांधकामांवर हातोडा
By admin | Updated: March 23, 2017 23:43 IST